हैदराबाद, 13 नोव्हेंबर : अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला (Chiranjeevi) कोरोनाने (Coronavirus) चांगलंच चकवलं. सुरुवातीला चिरंजीवी यांना covid -19 चा संसर्ग झाल्याची बातमी तीनच दिवसांपूर्वी आली होती. पण चार दिवसात अभिनेत्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. "कोरोनाने मला 4 दिवस गोंधळात टाकलं", असं सांगत चिरंजीवी यांनीच याबद्दल ट्वीट केलं आहे.
कोरोना टेस्टिंग किटमधल्या दोषामुळे चुकून पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असंही चिरंजीवी यांनी म्हटलं आहे. फॉल्टी RT PCR मुळे हा गोंधळ झाला.
रविवारी चिरंजीवी यांची कोरोना टेस्ट झाली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण चिरंजीवी यांना कोरोनाचं कुठलंच लक्षण दिसत नव्हतं. डॉक्टरांनीही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर त्यांचा CT scan करण्यात आला. त्यातही कोरोनाचं कुठलंही लक्षण दिसलं नाही. त्यामुळे दोनच दिवसात त्यांची पुन्हा एकदा कोविड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला गेला.
"रविवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले होते. पण लक्षणं नसल्याने मला शंका आली. डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा सीटी स्कॅन करायला सांगितलं. त्यातही कोरोनाचा संसर्ग गिसला नाही. मग पुन्हा टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही माझी तीन वेगवेगळ्या किटने चाचणी करण्यात आली. RT PCR टेस्टही पुन्हा केली गेली. पण तीही निगेटिव्ह आली आहे. चुकीच्या टेस्टिंग किटमुळे हा गोंधळ झाला होता. या काळाच तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे", असं चिरंजीवी यांनी Tweet करून लिहिलं आहे.
A group of doctors did three different tests and concluded that I am Covid negative & that the earlier result was due to a faulty RT PCR kit. My heartfelt thanks for the concern, love shown by all of you during this time. Humbled ! 🙏❤️ pic.twitter.com/v8dwFvzznw
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 12, 2020
मोठं च्या मोठं पत्र लिहून ते चिरंजीवी यांनी ट्वीट केलं आहे. चार दिवस कोरोनाने कसं गोंधळात टाकलं हे सांगणारं हे पत्र तेलुगूतून लिहिलं आहे. याशिवाय चिरंजीवी यांनी त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचा रिपोर्टही शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus