श्रीनगर, 13 नोव्हेंबर : कालपासून देशभरात दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना सीमारेषेवरीन एक दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानशी लढताना सब इन्स्पेक्टर राकेश डोवाल यांना वीरमरण आलं.
2/ 4
आज दुपारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यावेळी पाकिस्तानने तीन ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत गोळीबार सुरू केला. अनेक ठिकाणी तर बॉम्ब हल्लाही केला जात होता.
3/ 4
त्यातच एलओसीवर बारामुल्ला येथे BSF चे जवान सब इन्स्पेक्टर राकेश डोवाल हे पाकिस्तानला प्रत्युत्तर देत होते. दुपारी साधारण 12.20 च्या दरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर 1.15 वाजता ते शहीद झाले.
4/ 4
राकेश डोवाल Arty Regiment मध्ये होते. तर ते मूळचे उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गंगा नगरचे राहणारे होते. ते शहीद झाल्याचे वृत्त समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे.