लखनऊ 28 सप्टेंबर : उत्तर प्रदेशच्या
(UP) कानपूरमधल्या
(Kanpur) एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या
(Senior IAS Officer) सरकारी निवासस्थानातला (Government Home) एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. इस्लाम धर्म
(Islam religion) स्वीकारण्यासाठी नागरिकांना उद्युक्त केलं जात असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. तसं काही असेल, तर त्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी केली जाईल, असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य
(KP Mourya) यांनी म्हटलं आहे. 'एबीपी लाइव्ह'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मठ आणि मंदिर समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेश अवस्थी
(Bhupesh Avasthi) यांनी सांगितलं, 'मी हा व्हिडिओ पाहिला असून, त्यात हिंदू धर्माच्या विरोधात खूप निराधार गोष्टी सांगितल्या जात आहेत, अनेक आरोप केले जात आहेत. एका विशिष्ट धर्माच्या बाजूने गोष्टी सांगितल्या जात आहेत.'
भाच्याचा मामीवर बलात्कार, फरार आरोपी आला परीक्षा द्यायला; अडकला जाळ्यात
नेमकं काय आहे या व्हिडिओत?
वरिष्ठ आयएएस अधिकारी इफ्तेखारुद्दीन
(Iftekharuddin) यांच्या सरकारी निवासस्थानात हा व्हिडिओ चित्रित केल्याचं दिसत असून, त्यात इस्लाम धर्माचे एक धर्मगुरू तिथल्या उपस्थितांना इस्लाम धर्माचे पाठ शिकवत आहेत. त्यावेळी इफ्तेखारुद्दीन जमिनीवर बसलेले असल्याचं दिसत आहे. तेही उपस्थितांना इस्लाम धर्माचे धडे देत असल्याचा आरोप केला जात आहे.
इस्लाम धर्म स्वीकारल्याचे काय फायदे आहेत, ते उपस्थितांना धर्मगुरू सांगत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तसंच त्या धर्माविषयीच्या काही गोष्टीही ते सांगताना दिसत आहेत. 'अल्लाहाने आपल्याला उत्तर प्रदेशच्या रूपाने असं केंद्र दिलं आहे, की जिथून संपूर्ण देश आणि संपूर्ण जगासाठी काम करू शकतो,' असं धर्मगुरू त्या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
ट्रेनसमोर सुसाइडसाठी उभी होती तरुणी, रिक्षाचालकाने फिल्मी स्टाइलने वाचवले प्राण
व्हिडिओत ते धर्मगुरू असंही म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी पंजाबमधल्या एका व्यक्तीने इस्लाम कबूल केला (इस्लाम धर्म स्वीकारला). तेव्हा मी त्यांना धर्म स्वीकारण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं किंवा आग्रहही केला नव्हता. त्यांनी इस्लाम का कबूल केला, असं त्यांना विचारला असता, ते म्हणाले, की त्यांनी त्यांच्या बहिणीच्या मृत्यूच्या कारणामुळे इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्या व्यक्तीची बहीण मरण पावल्यानंतर तिला अग्नी देण्यात आला. तेव्हा ती निर्वस्त्र झाली. तेव्हा सर्व जण पाहत होते आणि त्या व्यक्तीला ती खूप शरमेची गोष्ट वाटली. तेव्हा ती व्यक्ती तिथून निघाली. त्या व्यक्तीने असा विचार केला, की आज आपल्या बहिणीला लोक पाहत आहेत. उद्या आपल्या मुलीचा मृत्यू झाला, तर तिलाही लोक असे पाहतील. तेव्हा त्या व्यक्तीच्या असं मनात आलं, की इस्लामपेक्षा कोणताही धर्म चांगला नाही. म्हणून तो स्वीकारला पाहिजे, असं त्या व्यक्तीला वाटलं. इस्लाममध्ये मुली-महिलांना मृत्यूनंतर अग्नी दिला जात नाही, तर दफन केलं जातं.'
'अशा वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या माध्यमांतून लोक इस्लाम धर्म स्वीकारत आहेत,' असा दावाही ते धर्मगुरू करत असल्याचं व्हिडिओत दिसतं.
हा प्रकार सरकारी अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानात घडल्याचं दिसत असल्याने, तसंच धर्म आणि धर्मांतराच्या अनुषंगाने वेगवेगळे दावे केले जात असल्याने त्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.