• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ट्रेनसमोर सुसाइडसाठी उभी होती तरुणी, रिक्षाचालकाने फिल्मी स्टाइलने वाचवले प्राण, कधी पाहिला नसेल असा VIDEO

ट्रेनसमोर सुसाइडसाठी उभी होती तरुणी, रिक्षाचालकाने फिल्मी स्टाइलने वाचवले प्राण, कधी पाहिला नसेल असा VIDEO

मृत्यू आणि तिच्यामध्ये काही सेकंदाचं अंतर होतं. त्यानंतर जे काही झालं ते पाहून पाहणाऱ्यांनाही धक्का बसला.

 • Share this:
  बैतूल, 27 सप्टेंबर : बैतूलमध्ये एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. अत्यंत जलद गतीने येणाऱ्या ट्रेनसमोर एक तरुणी आत्महत्या (Suicide attempt) करण्यासाठी उभी राहिली होती. ट्रेन आणि तरुणीमध्ये काही सेकंदाचं अंतर होतं, तेव्हा एक धाडसी ऑटो चालकाने आपल्या जीवाची बाजी लावत तरुणीचा जीव वाचवला. ही घटना बैतूलमध्ये सोनाघाटी रेल्वे फाटक येथील आहे. येथे चेहरा झाकलेली एक तरुणी बंद रेल्वे गेटजवळ बराच वेळ उभी बोती. तरुणी वारंवार आपला मोबाइल पाहत होती आणि ट्रेनची प्रतीक्षा करीत होती. यादरम्यान एका ऑटो चालकाना संशय आला. तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालणार असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो सतर्क झाला. (An auto rickshaw driver rescued a young woman who was trying to commit suicide in front of a train) शेवटी ऑटो चालकाचा संशय योग्य निघाला आणि जशी ट्रेन जवळ आली तरुणी ट्रेनच्या समोर ट्रॅकवर जाऊन उभी राहिली. ऑटो चालकाने वेळ दवडता तातडीने तरुणीला खेचून ट्रॅकवरुन बाहेर काढलं. ट्रेन आणि तरुणीच्या मध्ये काही सेकंदाचं अंतर होतं. जर ऑटो चालकाने धाडस दाखवून योग्य वेळेत तरुणीला बाहेर काढलं नसतं तर तिचा जीव गेला असता. यादरम्यान रेल्वे गेटचा कर्मचारीदेखील आले आणि त्यांनी तरुणीच्या मोबाइलवरुन तिच्या नातेवाईकांना फोन करून बोलावलं, यानंतर तरुणी आपल्या नातेवाईकांसह निघून गेली. हे ही वाचा-विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी अद्याप तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. ज्या ऑटो चालकाने तरुणीला वाचवलं त्याचं नाव मोहसिन असल्याचं सांगितलं जात आहे. मोहसिन हा बैतूलमधील ऑटो रुग्णवाहिकेचा चालक आहे. तो रस्ते दुर्घटनेमध्ये जखमी लोकांना रूग्णालयात पोहोटविण्याचे काम करतो. बैतूलच्या ऑटो रुग्णवाहिका टीनने मोहसिनचा सन्मान करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: