जयपूर, 27 सप्टेंबर : आपल्या मामीवर बलात्कार करून फरार झालेल्या (Police arrested rape accused at his exam center) आरोपीला पोलिसांनी रीट परीक्षा केंद्रावर अटक केली. मामीवर अत्याचार करून फरार झालेला (Raped his maternal aunt and absconded) हा आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अऩेकदा पोलिसांच्या तावडीतून सटकलेल्या या आऱोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. मात्र दरवेळी तो पोलिसांच्या तावडीतून सुटत होता. अखेर एका कॉन्स्टेबलने (Idea of a police constable) लढवलेल्या कल्पनेमुळे आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं.
पाच महिन्यांपासून फरार
राजस्थानच्या जयपूरमधील रामबाबू पवार या आरोपीनं मामाच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेत मामीवर जबरदस्ती केली होती. त्यानंतर तो तिथून फरार झाला होता. त्याच्या मामीने पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र रामबाबू सतत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना समजत नव्हता. आरोपी रामबाबू कधीही घरी फोन करत नसल्यामुळे त्याच्या ठिकाणाविषयी कुठलीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती.
कॉन्स्टेबलला सुचली कल्पना
हा आरोपी रीट एक्झाम देणार असल्याची टीप कॉन्स्टेबलला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवायला सुरुवात केली. त्या परिसरातील सर्व रेशन कार्डचे तपशील पोलिसांनी गोळा केले. त्यातून आरोपी रामबाबूच्या वडिलांचं रेशन कार्ड मिळालं. त्यात त्यांना रामबाबूचं नाव आणि आधार कार्डचा क्रमांक मिळाला. आधार कार्डवरून शोध घेतल्यानंतर पोलिसांना त्याचा मोबाईल नंबरदेखील मिळाला. त्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी त्याचा परीक्षा क्रमांक आणि परीक्षा सेंटर शोधून काढलं.
हे वाचा - प्रियकराची प्रेयसीसोबत फाशी, एकमेकांसोबत लग्न न झाल्याने टोकाचा निर्णय
परीक्षा केंद्रावर अटक
रामबाबूचं परीक्षा केंद्र शोधून काढल्यानंतर साध्या वेशातील पोलीस तिथं जाऊन पोहोचले. रामबाबू परीक्षेला आल्याचं त्यांनी पाहिलं. रामबाबू दोन पेपर देणार असल्याचं समजल्यामुळे त्याचे पेपर लिहून होईपर्यंत पोलीस बाहेरच वाट पाहत थांबले. परीक्षा देऊन तो बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
एका कॉन्स्टेबलला सुचलेल्या या कल्पनेमुळे एका गुन्हेगाराला गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळालं. आधुनिक तंत्रज्ञान आणि तर्काचा वापर करून केलेल्या या अटकेची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.