Home /News /explainer /

Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का?

Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का?

भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण वाढले आहेत, शिवाय एकूण कोरोना रुग्णसंख्येचा आलेखही भरभर वर जातो आहे.

नवी दिल्ली, 25 मार्च : देशभरातल्या कोरोना रुग्णसंख्येचा (Corona) आकडा गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढतो आहे. त्यात वेगवेगळ्या कोरोना स्ट्रेन्सची (Coronavirus strain) भर पडली आहे. इतर देशात आढळलेले कोरोनाचे नवे स्ट्रेन भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढते आहे. भारतात आतापर्यंत यूके (UK Strain), दक्षिण आफ्रिका (South African Strain) आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनची (Brazilian Strain) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी (24 मार्च) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरातल्या कोरोना रुग्णांपैकी 736 जणांना ब्रिटनमधल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचं आढळलं. त्याशिवाय 34 जणांना दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोना प्रकाराची, तर एकाला ब्राझीलमधल्या कोरोना प्रकाराची लागण झाल्याचं आढळलं. ब्रिटनमधल्या स्ट्रेनसह दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनही जगभरात व्हायरल झालेल्या आहेत. या स्ट्रेनमध्ये जनुकीय बदल झाल्यामुळे मानवी प्रतिकारशक्ती त्यावर प्रभाव टाकू शकत नाही. त्यामुळे सध्या लसीकरणाद्वारे ज्या लशी दिल्या जात आहेत, त्या लशी कोरोनाच्या या प्रकारांवर तितक्या प्रभावी ठरणार नाहीत, असा अंदाज आहे; मात्र अद्याप ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नसून, त्या दिशेने संशोधन सुरू आहे. भारतातील कोरोनाची स्थिती (स्ट्रेननुसार) ब्रिटिश स्ट्रेन एकूण नमुने : 736 पंजाब : 336 तेलंगण : 87 दिल्ली : 65 महाराष्ट्र : 56 गुजरात : 39 कर्नाटक : 30 राजस्थान : 22 उत्तर प्रदेश : 17 केरळ : 16 तमिळनाडू : 14 मध्य प्रदेश : 11 उत्तराखंड : 11 प. बंगाल : 10 हरियाणा : 6 गोवा : 5 ओडिशा : 3 लडाख : 1 साउथ आफ्रिकन स्ट्रेन : एकूण नमुने : 34 तेलंगण : 17 महाराष्ट्र : 5 दिल्ली : 4 कर्नाटक : 3 आंध्र प्रदेश : 3 तमिळनाडू : 1 प. बंगाल : 1 ब्राझिलियन स्ट्रेन महाराष्ट्र : 1 भारतात आढळलेले कोरोनाचे प्रकार (Variants) ब्रिटिश, ब्राझिलियन आणि दक्षिण आफ्रिकन हे भारतात आढळलेले कोरोनाचे केवळ तीनच प्रकार नव्हेत. अन्य कोणत्याही जीवाप्रमाणेच कोरोना विषाणूही सातत्याने स्वतःमध्ये जनुकीय बदल (Mutation) घडवून आणत असून, त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढीत जनुकीय संरचना (Genetic Structure) बदलते. त्यातले बहुतांश बदल फारसे मोठे नसतात; पण हजारात एखादा बदल असा असू शकतो, की ज्याद्वारे विषाणूला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आपलं अस्तित्व चांगल्या पद्धतीने टिकवता येतं. हे वाचा - सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अशा बदलांवर शास्त्रज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विषाणूची प्रसार होण्याची क्षमता वाढवणारे, लागण झालेल्या व्यक्तीला गंभीररीत्या आजारी पाडण्याची क्षमता असलेले आणि मानवी प्रतिकाशक्तीपेक्षा सरस असलेले विषाणूतले बदल टिपले जात आहेत. कोरोनाच्या ब्रिटिश, साउथ आफ्रिकन आणि ब्राझिलियन स्ट्रेन या प्रकारातल्या आहेत. त्या प्रत्येक प्रकाराच्या विषाणूची आता स्वतंत्र कुटुंबं आहेत; म्हणजे त्यातही छोटे छोटे बदल होऊन पुढच्या पिढ्या तयार झाल्या आहेत; मात्र त्याची मूळ रचना कायम आहे. या तीन व्हेरिएंट्सच्या कुटुंबातल्या कोरोना विषाणूची लागण अनेक देशांतल्या व्यक्तींना झाल्याचं दिसून आलं आहे. युरोप आणि ब्राझीलमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेचं कारण या प्रकारच्या विषाणूंमध्ये दडलेलं आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूचे आणखीही काही व्हेरिएंट्स भारतीय लोकसंख्येत दिसून आले आहेत. त्यातले काही भारतातच विकसित झाले असून, काही प्रकार परदेशातून आले आहेत. अर्थात त्यापैकी कोणत्याही व्हॅरिएंटबद्दल फारसं काळजीचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन कोरोना संक्रमण वाढीला कारणीभूत? देशात सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमागे ब्रिटिश, साउथ आफ्रिकन किंवा ब्राझिलियन स्ट्रेन कारणीभूत नाही, असं आपलं म्हणणं शास्त्रज्ञांनी कायम ठेवलं आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्या प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत फारशी मोठी नाही. हे वाचा - Alert! पुढील 2 आठवड्यांत दिवसाला 1000 कोरोना बळी जातील; आरोग्य विभागाचा इशारा ब्रिटनमधल्या स्ट्रेनची लागण झालेले सर्वाधिक 336 रुग्ण पंजाबात आहेत पंजाबातही 400पैकी 80 टक्के नमुने ब्रिटिश स्ट्रेनचे आढळले, तरीही त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा करणं घाईचं ठरेल, असं शास्त्रज्ञ म्हणतात. जीनोम सिक्वेन्सिंग झालं असून, क्लिनिकल कोरिलेशननंतरच नेमका निष्कर्ष काढता येणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पंजाबमध्ये आढळलेले ब्रिटिश स्ट्रेनचे सगळे कोरोना रुग्ण परदेशात प्रवास करून आलेले किंवा त्यांच्या थेट संपर्कातले असते, तर त्यांचं कारण शोधणं अवघड नव्हतं आणि फारसं काळजीचंही नव्हतं; मात्र त्याहून जास्त मोठ्या लोकसंख्येत हे प्रकार आढळत असतील, तर ते आणखी लोकांपर्यंत तातडीने पसरण्याचा धोका आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की परदेश प्रवास करून आलेल्यांसाठी क्वारंटाइन आणि अन्य प्रक्रिया पंजाबात गांभीर्याने केल्या जात नसाव्यात, अशीही शंका शास्त्रज्ञांनी उपस्थित केली आहे. E484Q आणि N440K ही ब्रिटिश स्ट्रेनमधली काही म्युटेशन्स दुसऱ्या काही प्रकारांतही आढळली असून, भारतीयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फिरत आहेत; मात्र त्यातून दुसरी लाट उद्भवली असेल का, याबद्दल ठोस निष्कर्ष अद्याप निघालेला नाही. त्यासाठी अधिक शास्त्रीय विश्लेषण आवश्यक आहे.
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या