Home /News /news /

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यविधीसाठी मृतदेह वेटिंगवर

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यविधीसाठी मृतदेह वेटिंगवर

राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करणार का?

नांदेड, 25 मार्च : नांदेडमध्ये आज सकाळपासून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 13 रुग्णांचा अंत्यविधी शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमीत करण्यात आला. गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांग लागली होती. स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागले होते. लोखंडी स्टँड कमी असल्याने स्मशानभूमीच्या आवारात खालीच लाकडे रचून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 683 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र, सोबत पोलिसांची एनओसी आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांकडून सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. नांदेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने वाढत आहेत. मृतांची संख्या देखील वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर शहरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार केले जातात. ग्रामीण किंवा तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्ण गंभीर झाले तर त्याला देखील शहरातील रुग्णालयात हलवलं जात. हे ही वाचा-महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; शेजारील राज्यातून आली मोठी बातमी अशात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नियमानुसार महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेची असते. तेव्हा शहरातील सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्ण दगावला तर महापालिकेकडून अंत्यविधी केला जातो. शहरातील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. पण स्मशानभूमीत लोखंडी दाहवाहिनी आहेत. त्यांची संख्या सात आहे. विद्युत दाहवाहिनी इथे नाही. एका लोखंडी दाहवाहिनीवर 10 ते 24 तासात फक्त एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. नंतर अस्थि संकलनासाठी किमान 10 तासाचा अवधी लागतो. दाहवाहिनी कमी आणि मृतांची संख्या जास्त असल्याने आता नांदेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील रांग लावावी लागत आहे. कोरोनाशिवाय अन्य आजार आणि नैसर्गिक मृत्यू देखील होत आहेत. अशात अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या