मराठी बातम्या /बातम्या /देश /

राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये, एकत्र केलं स्नेहभोजन

राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये, एकत्र केलं स्नेहभोजन

राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र

राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र

Sanjay Raut and Navneet Ravi Rana in Ladakh: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य हे लेह-लडाख दौऱ्यावर आहेत.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 19 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला. यावरुन मुंबईत मोठा गदारोळ झाला. इतकंच नाही तर राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे हेच संजय राऊत (Sanjay Raut) आणि खासदार नवनीत राणा, आमदार नवनीत राणा हे लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसून आलं.

संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एकूण 30 खासदारांचा समावेश असून त्यात खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यात सुद्धा उपस्थित आहेत.

वाचा : पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, VIDEO

एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत आणि नवनीत राणा हे एकत्र दिसून आले. आमदार रवी राणा आणि संजय राऊत हे एकमेकांसोबत जेवण करतानाही दिसून आलं आहे. त्यासंदर्भातील फोटोजही व्हायरल झाले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांवर कितीही टीका करत असले तरी वैयक्तिक आयुष्यात हे नेते एकमेकांना भेटत असतात, एकमेकांच्या कार्यक्रमातही उपस्थित राहत असतात.

आता या दौऱ्यात संजय राऊत आणि नवनीत राणा हे एकमेकांसोबत बोलणार का? हे पहावं लागेल.

संजय राऊतांचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत नवनीत राणा यांच्यावर आरोप केला. नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज युसूफ लकडावाला याच्याकडून घेतल्याचा आरोप राऊतांनी केला.

युसूफ लकडावाला याचे दाऊदच्या डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदचा हस्तक असलेल्या याच युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात नवनीत राणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सुद्धा माहिती दिली होती. त्याचेच कागदपत्रे संजय राऊतांनी ट्विट केले होते.

First published:

Tags: Ladakh, Maharashtra News, Navneet Rana, Ravi rana, Sanjay raut