Ayodhya Verdict : एका अटकेमुळे वाढली भाजपची राजकीय उंची

Ayodhya Verdict : एका अटकेमुळे वाढली भाजपची राजकीय उंची

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्डाची याचिका फेटाळून लावत ट्रस्ट तयार करून राम मंदिर उभारण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

  • Share this:

समस्तीपूर, 10 नोव्हेंबर : अयोध्येतील वादग्रस्त जागेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रामलल्ला न्यासाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे मुस्लीम पक्षकार नाराज झाले असले तरी यामुळे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नक्कीच आनंद झाला असेल. विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणींनी 92 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. मात्र 23 ऑक्टोबर 1990 मध्ये बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांनी ही यात्रा थांबवली आणि समस्तीपूर इथं त्यांना अटक केली. या घटनेनं देशातील राजकारणाने वळण घेतलं आणि भाजपची राजकीय पाळमुळं यामुळं खोलवर रुजली आणि त्यांची राजकीय उंची वाढली.

भाजपच्या राजकीय यशाचं श्रेय अनेक वेळा अटलबिहारी वाजपेयी यांच्यापेक्षाही लालकृष्ण अडवाणींना दिलं जातं. भाजपचे कार्यकर्ते अडवाणींच्या रथयात्रेची आठवण अभिमानाने काढतात. पण त्याचवेळी लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली होती याचीही आठवण काढली जाते. लालूप्रसाद यादव यांचं 'गोपालगंज टू रायसीना - माय पॉलिटिकल जर्नी' हे आत्मचरित्र सध्या गाजतं आहे. यामध्ये लालूंनी ही गोष्ट सांगितली आहे. जो कोणी अडवाणींवरच्या कारवाईला अटकाव करेल त्याला गोळी मारा, असे आदेश लालूप्रसाद यादव यांनी दिले होते.

लालकृष्ण अडवाणींना 23 ऑक्टोबर 1990 ला अटक करण्यात आली. लालूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, माझी रथयात्रा रोखण्याचं काम जर कुणी केलं तर मी त्याला बघून घेईन, असं अडवाणी म्हणाले होते. अडवणींनी विरोधकांना मोठं आव्हान दिलं होतं.

लालू प्रसाद यादव यांनी धनबादचे उपायुक्त अफजल अमानुल्लाह यांना अडवाणींना अटक करण्याचे आदेश दिले पण अमानुल्लाह यांनी हे करायला नकार दिला. अडवाणींना अटक केली तर देशात तणाव वाढेल, असं त्यांना वाटत होतं. पण आर. के. सिंह यांनी मात्र अडवाणींना अटक केली.

अडवाणी यांच्या अटकेमुळेच भाजपने व्ही. पी. सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि ते सरकार पडलं व्ही. पी. सिंग यांच्या मंडल अस्त्राला शह देण्यासाठी भाजपने मंदिराचं ब्रह्मास्त्र काढलं. या सगळ्या घटनांमुळे देशाचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं. व्ही. पी. सिंग यांच्या पतनानंतर काँग्रेसच्या मदतीने चंद्रशेखर पंतप्रधान बनले.

राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण तापवण्यासाठी अडवणींनी 25 सप्टेंबर 1990 मध्ये रथयात्रा सुरू केली. रथयात्रेचा पहिला टप्पा 14 ऑक्टोबरला पूर्ण झाला. अडवाणी दिल्लीला आले तेव्हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ज्योति बसु यांना दिल्लीला बोलवलं. ज्योति बसु यांनी अडवाणींशी चर्चा केली आणि त्यांना रथयात्रा थांबवण्याचा सल्ला दिला. पण अडवाणी यांनी हा सल्ला फेटाळून लावला होता.

समस्तीपूरमध्ये राहणाऱ्या एका पत्रकाराने त्यावेळी वार्तांकन केलं होतं. त्यांनी सांगितलं की, अडवाणींना अटक केली तेव्हा तणावाचं वातावरण होतं. हाजीपूर ते समस्तीपूर या रथयात्रेसोबत मी होतो. तेव्हा अडवाणींचं जोरदार स्वागत झालं होतं. त्याचवेळी आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालत होती.

अयोध्या निकाल निश्चित करण्यात महत्त्वाचे ठरले 'हे' मुद्दे!

अडवाणींच्या अटकेनंतर त्यांना झारखंडमधील अतिथीगृहात नेण्यात आलं. त्यांच्या अटकेनंतर रथ यात्रा थांबली तरी मोठ्या प्रमाणावर लोकांचा विरोध वाढला. अनेक शहरात दंगलीचं वातावरण निर्माण झालं. त्यात उत्तर भारतात हे वातावरण सर्वाधिक तणावग्रस्त होतं.

SPECIAL REPORT : के.के. मोहम्मद यांनी शोधले राम मंदिराचे अवशेष!

रथयात्रेत अडवाणींच्या अटकेनंतर भाजपला फक्त फायदाच झाला नाही तर पक्षाची राजकीय ताकदसुद्धा वाढली. याशिवाय लालु प्रसाद यादव यांनाही बिहारमध्ये फायदा झाला. भगव्याविरुद्ध लढणारा नेता म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. मुस्लीम नेत्यांचे प्रमाण कमी असल्यानं मागास आणि अल्पसंख्यांकासाठी लढणारे नेते म्हणून लालु प्रसाद यादव पुढे आले.

Ayohdya Verdict : 93 वर्षांच्या या वकिलांनी 40 वर्षं लढली रामलल्लाची लढाई

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

First published: November 10, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading