मुंबई, 09 नोव्हेंबर : भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्तर विभागाचे माजी संचालक आणि पुरात्व शास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांचं या प्रकणात मोठं योगदान आहे. मोहम्मद यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलंय. देशाचं लक्ष लगून राहिलेल्या अयोध्या प्रकरणावर अखेर निकाल आला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल देताना पुरातत्व विभागाचे दावे कोर्टानं ग्राह्य धरले. पुरातत्त्व विभागाच्या उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. पुरातत्व विभागाच्या उत्तर विभागाचे माजी संचालक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ मोहम्मद यांनीच वादग्रस्त वास्तुखाली जमिनीत मंदिराचे अवशेष शोधून काढले होते. 1976 साली अयोध्येत बी. बी. लाल यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्वीय उत्खनन करण्यात आलं होतं. लाल यांच्या पथकाचे सहकारी म्हणून मोहम्मद यांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी मोहम्मद यांनी अयोध्येत रामाचं अस्तित्त्व असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. तरीही ते विधानावर ठाम राहिले. अयोध्या निकालानंतर त्यांनी समाधानकारक निकाल असल्याची प्रतिक्रिया दिली. मोहम्मद हे असे पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. ज्यांनी आजवर हिंदुस्थानातील अनेक पुरातन मंदिरे शोधण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. त्यांनी आपला हा प्रवास ‘मैं भारतीय हूँ’ या पुस्तकातून शब्दबद्ध केला आहे. त्यातही त्यांनी राम जन्मभूमीविषयी 1976 साली झालेल्या उत्खननाचा उल्लेख केला आहे. उत्खननात सापडलेल्या अवशेषांमध्ये मंदिराचे स्तंभ, वास्तुकलेत शुभचिन्ह म्हणून घडवले जाणारे स्तंभातील कलश सापडल्याची नोंद त्यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. एकंदरीतच न्यायदानाच्या प्रक्रियेत निर्णयापर्यंत जाण्याच्या प्रवासात के. के. मोहम्मद यांचा मोलाचा वाटा आहे, यात शंकाच नाही. ================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







