Ayohdya Verdict : 93 वर्षांच्या या वकिलांनी 40 वर्षं लढली रामलल्लाची लढाई

Ayohdya Verdict : 93 वर्षांच्या या वकिलांनी 40 वर्षं लढली रामलल्लाची लढाई

रामलल्लाचा वनवास दूर करण्यात एका 93 वर्षांच्या वकिलांचं योगदान आहे. ज्येष्ठ वकील के. पारासरन यांनी हिंदू पक्षाची बाजू कोर्टात मांडली. ते सुमारे 40 वर्षं ही लढाई लढत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अयोध्येमधला रामजन्मभूमीचा वाद अखेर संपलाय. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय देत ही वादग्रस्त जागा रामलल्लाला दिली आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी केंद्र सरकारतर्फे 5 एकर जागा देण्यात येणार आहे. याचबरोबर निर्मोही आखाड्याचे दावेही फेटाळून लावण्यात आले.

रामलल्लाचा हा वनवास दूर करण्यात एका 93 वर्षांच्या वकिलांचं योगदान आहे. ज्येष्ठ वकील के. पारसरण यांनी हिंदू पक्षाची बाजू कोर्टात मांडली. ते सुमारे 40 वर्षं ही लढाई लढत होते.

सगळे दाखले तोंडपाठ

के. पारासरन यांच्या पथकात काही तरुण वकीलही आहेत.पारसरण सांगतात, मला भगवान रामाशी अध्यात्मिक नातं जाणवतं. त्यामुळे मी हा खटला लढला. सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणी रोज सुनावणी सुरू होण्यापूर्वी पारासरन यांनी या खटल्याचे प्रत्येक पैलू तपासले. रोज सकाळी साडेदहा वाजता ते या खटल्यातल्या सगळ्या कायदेशीर बाजू समजून घ्यायचे. त्यांचं काम संध्याकाळपर्यंत सुरूच राहायचं.

(हेही वाचा : 'नवी सुरुवात करुया, नवा भारत घडवूया', अयोध्या निकालानंतर मोदींचा संदेश)

पारासरन यांच्या टीममधले तरुण वकील त्यांचा हा ध्यास, मेहनत आणि झुंजार वृत्तीमुळे प्रेरित झाले. ते सांगतात, पारासरन या खटल्याशी एवढे जोडले गेले होते की त्यांनी खटल्याशी संबंधित सगळ्या तारखा तोंडपाठ होत्या. कोणत्या तारखेला कोणती घटना झाली हे सगळं ते हाताच्या बोटांवर गणती करूनही सांगू शकायचे. त्यांचं यावर एवढं संशोधन होतं की ते आता एक पुस्तक लिहू शकतात.

एकत्र काढला फोटो

रामसरन यांच्यासमोर मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन होते. राजीव धवन हे त्यांच्या अचाट तर्कवितर्कांसाठी ओळखले जातात. पण त्यांच्याशी वादविवाद करताना पारासरन यांनी कधीही संयम ढळू दिला नाही. राजीव धवन यांनी हिंदू पक्षाने सादर केलेली कागदपत्रंही फाडली होती. तरीही पारासरन शांत राहिले.

सुप्रीम कोर्टातली सुनावणी जेव्हा 16 ऑक्टोबरला पूर्ण झाली तेव्हा पारासरन यांनी राजीव धवन यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली आणि या दोघांनी एकत्र फोटोही काढला. कोर्टात जरी एकमेकांच्या विरुद्द लढलो असलो तरी आम्ही वैयक्तिक आयुष्यात एकमेकांच्या विरोधात नाही, हेच त्यांना सांगायचं होतं.

===============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 9, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading