अयोध्या निकाल निश्चित करण्यात महत्त्वाचे ठरले 'हे' मुद्दे!

अयोध्या निकाल निश्चित करण्यात महत्त्वाचे ठरले 'हे' मुद्दे!

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. यामध्ये शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावत वादग्रस्त जागेचा ताबा रामलला न्यासाला देण्याचे आदेश देण्यात आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्याायधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये वादग्रस्त जागेचा निर्णय अत्यंत संवेदनशील असा होता. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा मालकी हक्क रामलला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणावर नियमित सुनावणी झाली आहे. 40 दिवस चाललेल्या या सुनावणीनंतर 17 ऑक्टोंबरला निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या सुनावणीवेळी मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन आणि इतर वकीलांनी केलेल्या प्रतिवादावरही स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच भारताच्या पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टचा आधार घेत असंही सांगितलं की अयोध्येतील मशिद रिकाम्या जागेवर उभारली नव्हती.

अयोध्या प्रकरणी मुस्लिम पक्षाने त्यांचे म्हणणे मांडताना म्हटलं होतं की, वादग्रस्त जागी नियमितपणे नमाज पठण आणि मशिदीच्या अस्तित्वावर कधीच प्रश्न उपस्थित करता येणार नाही. तसेच अयोध्येत मंदिर पाडून मशिदीची उभारणी केली नव्हती तर रिकाम्या जागी मशिद बांधली होती.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एएसआयने केलेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करात येणार नाही. बाबरी मशिद ही रिकाम्या जागेवर बांधण्यात आली नव्हती. मशिदीच्या खाली बांधकाम होते. एएसआयने 12 व्या शतकातील मंदिर असल्याचं म्हटलं होतं. तसेच जे मिळालं त्यावरून ते गैर इस्लामिक होतं असंही नमूद केलं. यावर भर देत सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही प्रकारे एएसआयच्या अहवालाकडे कानाडोळा करता येणार नाही असं म्हणत रिकाम्या जागी मशिद बांधल्याची याचिका फेटाळून लावली.

1856 च्या अगोदर याठिकाणी नमाज पठण होत असल्याचा दावा मुस्लिम पक्षाला सिद्ध करता आला नाही. याशिवाय त्यांनी म्हटलं होतं की, 1934 ते 1949 पर्यंत नमाज पठण केलं जात होतं. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या पहिल्या दाव्याला फेटाळून लावलं. तर दुसऱ्या बाजूला हिंदु पक्षाने बाहेरील चौथऱ्यावर हिंदुंचा ताबा होता आणि तिथं पूजा केली जात होती हे सिद्ध केलं.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सांगितलं की, हा वाद भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावरून आहे. जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे. धवन यांनी प्रतिवाद करताना सांगितलं की, धर्म शास्त्राबद्दल स्वत: कल्पना करता येत नाही ते चुकीचे ठरेल. जन्मस्थळाचा मुद्दा हा विश्वास आणि श्रद्धा यावर आधारीत आहे. जर हे स्वीकारलं तर त्याचा मोठा परिणाम होईल.

वाचा : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आहेत 2 पर्याय

यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, मंदिर पाडून मशिद बांधल्याचं एएसआयला सांगता आलेलं नाही. अयोध्येत राम जन्मस्थळाच्या दाव्याला कोणाचाही विरोध नाही. वादग्रस्त जागी हिंदूंकडून पूजा केली जात होती. साक्षीदारांच्या उलट तपासणीतून हिंदूंचा दावा चुकीचा ठरवता आला नाही. हिंदू मशिदीच्या गोल घुमटालाच प्रभू रामाचे जन्मस्थान मानतात. रामललाबाबत ऐतिहासिक संदर्भ सापडले. त्यासोबतच चौथरा आणि सीता रसोई याचाही उल्लेख आढळला.

वाचा : शिया बोर्डानं अशी काय याचिका केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

मशिद कधी बांधण्यात आली याने काही फरक पडत नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शिया विरुद्ध सुन्नी यांच्यातील प्रकरणात एकमताने निर्णय घेतला गेला. शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळून लावण्यात आली. 22-23 डिसेंबर 1949 रोजी मुर्ती ठेवण्यात आली. एका व्यक्तीची श्रद्धा दुसऱ्या कोणाला हिरावून घेण्याचा अधिकार नाही. नमाज पठण करण्याच्या जागी मशिद असल्याचं नाकारता येत नाही. तसेच ही सरकारी जमीन असल्याचंही मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं.

वाचा : राम जन्मभूमी न्यासाला मिळाली वादग्रस्त 5 एकर जागा!

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या