Home /News /national /

VIDEO : माऊलीला सलाम! लेकीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी देश सेवेसाठी सज्ज झाली ही कोरोना योद्धा

VIDEO : माऊलीला सलाम! लेकीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी देश सेवेसाठी सज्ज झाली ही कोरोना योद्धा

ही माऊली आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर आपले दु:ख विसरत अगदी दोन दिवसांनी पुन्हा कामावर रुजू झाली. ओडिशामधील या कोरोना वॉरियस एक होमगार्ड आहेत.

    नवी दिल्ली, 05 मे : देशात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही काही लोकं लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. मास्कचा वापर न करता किंवा गरज नसताना रस्त्यावर उतरत आहे. अशा बेजबाबदार लोकांमध्ये काही लोकं आपल्या घराची पर्वा न करता कोरोना योद्धा बनून ही लढाई लढत आहेत. अशीच एक कोरोना वॉरियर (Corona Warriors) ओडिशामध्येही (Odisha) आहे. ही माऊली आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर आपले दु:ख विसरत अगदी दोन दिवसांनी पुन्हा कामावर रुजू झाली. ओडिशामधील या कोरोना वॉरियस एक होमगार्ड आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव गौरी बहरा आहे. गौरी सध्या कोरोनाच्या संकटात स्पेशल ड्युटी करत आहेत. गौरी यांना एक 13 वर्षांची मुलगी होती, जिला कॅन्सर झाला होता. गौरी कामावर असतानाच, त्यांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना कळलं. गौरी सायकलवरून घरी पोहचल्या. ऑफिस ते घर असे तीन किमीचे अंतर गौरी यांनी सायकलने गाठले. मात्र त्या घरी पोहचण्याआधीच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. वाचा-'...तरच अर्थव्यवस्था सुरळीत होईल',राहुल गांधीशी बोलताना अभिजीत बॅनर्जींचा सल्ला गौरी यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना माझे जग कोसळले असे वाटले. मुलगी पाहिल्यानंतर मला असे वाटले की जणू माझे जग कोसळले आहे. गेल्या एक वर्षापासून आपल्या मुलीला यकृताचा कर्करोग असल्याचे गौरीने सांगितले. मुलीच्या निधनानंतर, ती दोन दिवस घरी होती. मात्र देश संकटात असताना, माझी तिकडे जास्त गरज आहे असे गौरी यांना वाटले. दोन दिवसांनी लगेच त्यांनी कामावर पुन्हा रुजू होण्याचा निर्णय घेतला. वाचा-दोन वेळचं अन्न मिळत नसताना राहुल देव झाला पाकमधील पहिला हिंदू पायलट वाचा-बोहल्यावरून थेट आजीची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचली लाडकी नात, पाहा VIDEO ओडिशा सीएमओ ऑफिसनं घेतली दखल ओडिशा मुख्यमंत्री कार्यालयानं गौरी बहराचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर एसपी उमाशंकर दास यांनी गौरी यांनी केलेल्या कार्याबद्दल, “या दु: खाच्या वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांनी हे काम करून एक आदर्श ठेवला आहे.”, असे सांगितले.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या