Home /News /money /

'...तरच अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होईल', राहुल गांधीशी बोलताना अभिजीत बॅनर्जींचा सल्ला

'...तरच अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होईल', राहुल गांधीशी बोलताना अभिजीत बॅनर्जींचा सल्ला

राहुल गांधी यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी म्हणाले की लोकांना आर्थिक मदत करणे हा अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करण्याचा मार्ग आहे.

    नवी दिल्ली, 05 मे : देशावर कोरोनाचे मोठे संकट असताना, अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहे. देशाची आर्थक घडी कशी बसवता येईल यासंदर्भात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी विविध अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी सुद्धा यासंदर्भात बातचीत केली. याआधी त्यांनी रघुराम राजन यांच्याबरोबर अर्थव्यवस्थेसंदर्भात चर्चा केली होती. लोकांना आर्थिक मदत करणे हा अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करण्याचा सर्वात सोपा मार्ग असल्याचे यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. लोकांना पैशांचे हस्तांतरण करणे गरजेचं असल्याचे म्हणाले. (हे वाचा-मोठी अमेरिकन कंपनी करणार JIOमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक,वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे) कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान टाळण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांसदर्भात बॅनर्जी म्हणाले की, 'अनेक देशांनी छोट्या उद्योगांंसाठी आर्थिक पॅकेज (stimulus package) जाहीर केले आहे. आपण त्यादृष्टीने अद्याप ठोस पावले उचलेली नाहीत. कर्जाची परतफेड करण्यासाठी मोरटोरियम हे एक योग्य पाऊल असले तरी आपल्याला आणखी निर्णय घेणेही आवश्यक आहे.' ते पुढे म्हणाले की, 'समस्या अशी आहे की युपीए सरकारची काही कमकुवत धोरणं या सध्याच्या सरकारने स्वीकारली आहेत.' ते पुढे म्हणाले की, 'ज्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही अशांना पैसे मिळावेत याकरता राज्य सरकारांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. अगदी त्वरित हे पैसे देण्याची गरज नाही मात्र अशा लोकांना सरकारने आश्वासन दिले पाहिजे की त्यांना निधी मिळेल. एका ठराविक काळानंतर सरकार निश्चित हा निधी देऊ शकेल'. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या