इस्लामाबाद, 05 मे : पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदू (Hindu) आणि इतर अल्पसंख्यांकांवर अन्याय आणि भेदभाव केल्याच्या बातम्या सतत येत असताता. मात्र पहिल्यांदाच बॉर्डरवरून एक चांगली बातमी आली आहे. पाकिस्तान एअर फोर्सला पहिला हिंदू पायलट मिळाला आहे. पाकिस्तान एअरफोर्सचा पहिला हिंदू पायलट राहुल देव सिंध विभागातील आहे आणि जनरल ड्युटी पायलट म्हणून त्यांची नेमणुक करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की ते एअरफोर्ससाठी लढाऊ विमान किंवा वाहतूक विमान चालवू शकतात. याआधी 16 एप्रिल रोजी राहुल देव यांना पाकिस्तान एअर फोर्स अकादमी रिसलपूरच्या वतीनं कमीशंड करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानच्या हवाई दलाचे एअर चीफ मार्शल मुजाहिद अन्वर खान देखील उपस्थित होते. राहुलची पायलट म्हणून नेमणूक झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही बातमी सर्वप्रथम प्रधान कर्मचारी अधिकारी रफिक अहमद खोकर यांनी गृहमंत्री सेवानिवृत्त ब्रिगेडियर एजाज शाह यांनी ट्विटद्वारे शेअर केली. वाचा- CRPF जवानांनी मुंबईत दिला कोरोनाला लढा, पण गावी पोहोचल्यावर…
वाचा- अखेर पठ्ठ्याला मिळाला दारूचा खंबा, मग रस्त्यावरच असं काही केलं की… पाहा VIDEO पाकमधील गरीब भागातून आले आहेत राहुल देव राहुल देव यांनी पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये स्थान मिळवले असले तरी त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यासाठी खूप संघर्ष केला आहे. राहुल देव हे सिंधच्या थरपरकर सारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागातून आले आहेत. पाकिस्तानच्या या भागात हिंदू मोठ्या संख्येने आहेत. मात्र असे असले तरी येथे मूलभूत सुविधा नाहीत किंवा चांगल्या शाळा किंवा शैक्षणिक संस्था नाहीत. पाकिस्तानमधील याच भागातून कुपोषणामुळे सर्वात जास्त मुलांचा मृत्यू होतो. याआधी खासदार महेश मलानी हेदेखील थरपरकर भागातून पाकिस्तानच्या संसदेत जिंकून आले होते. ही जागा जिंकणारे ते पहिले हिंदू आहेत. वाचा- लवकरच मिळणार कोरोनावर लस, ‘या’ देशानं केलं महत्त्वाचं संशोधन पाकिस्तानच्या सैन्यात 100 हिंदूही नाहीत? दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या सैन्यात 12 लाख 40 हजार सैनिक आहेत. त्यातील 6 लाख अॅक्टिव्ह आहेत. मात्र यात 100 सैनिकही हिंदू नाही आहेत. मुख्य म्हणजे पाकिस्तानी सैन्यात किती हिंदू आहेत, याबाबतची आकडेवारी कोणत्याही मंत्रालयात नाही आहेत. पाकमध्ये हिंदू जवानांची नोंद ते शहीद झाल्यानंतरच केली जाते. राहुल पाकिस्तान एअर फोर्समधील पहिले हिंदू नाही आहेत. याआधी एअक कमांडर बलवंत कुमार दास यांनी नेमणुक करण्यात आली होती.