जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; ब्लास्टिंगमध्ये 2 जणांचा मृत्यू, 7 जखमी

पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; ब्लास्टिंगमध्ये 2 जणांचा मृत्यू, 7 जखमी

पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.

पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.

पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

नवी मुंबई, 23 डिसेंबर : पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे. जखमींना कर्जत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम चालू असताना मोठे दगड रस्त्यावर आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे मार्गाच काम चालू असताना अपघात  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. यावेळी झालेल्या ब्लस्टिंगमुळे मोठे दगड रस्त्यावर आल्यानं हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा :      दिलदारने रिबिकाची कातडी सोलून केले 50 तुकडे; डॉक्टर म्हणाले, असे पोस्टमॉर्टम कधीच केले नाही अपघातानंतर स्थानिक आक्रमक   दरम्यान या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं  आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल नागरिकांमधून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात