• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुप्त बैठकीत 'चादर आणि फादरमुक्त भारत' करण्याची चर्चा; उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मोठी रणनिती?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुप्त बैठकीत 'चादर आणि फादरमुक्त भारत' करण्याची चर्चा; उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मोठी रणनिती?

संघाच्या बैठका इतक्या गुप्त का असतात? त्यांना इतके कडक सुरक्षा कवच का दिले जाते? हे प्रश्न आजही पडतात.

 • Share this:
  पुणे, 14 जुलै: मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सीमेवर असलेल्या चित्रकूट (Chitrakoot) या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वरिष्ठ नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची नुकतीच पाच दिवसांची एक अत्यंत गोपनीय बैठक (Meeting) झाली. उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. दैनिक भास्करच्या टीमनं अनेक प्रयत्न करून इथं जाण्यासाठी परवानगी मिळवली आणि अनेक सूत्रांच्या माध्यमातून या बैठकीत झालेल्या गुप्त चर्चेबाबत माहिती हस्तगत केली. त्याआधारे त्यांनी हे वृत्त दिलं आहे. कडक सुरक्षाव्यवस्था : अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या संघाच्या या बैठकीबाबत माध्यमांनाही (Media) माहिती देण्यात आली नव्हती. या बैठकीबाबत कोणतेही वृत्तांकन करण्यासाठी माध्यमांना प्रवेश नव्हता. ज्या ठिकाणी ही बैठक सुरू होती तिथपासून तीन किलोमीटर आधीपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. चौकशी केल्याशिवाय कोणालाही या परिसरात सोडले जात नव्हते. स्थानिक पत्रकार, संघाचे काही कार्यकर्ते यांनीही इथं काहीही बातमी मिळणार नाही, असं सांगून या टीमला परत जायला सांगितलं होतं. तरीही जिद्दीनं इथं राहून या दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट असूनही लोकांची गर्दी झाल्याचं धक्कादायक दृश्य या टीमनं टिपलं. मास्क, सुरक्षित अंतर या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवून लोकांनी इथं कामगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी कामतानाथ मंदिरात गर्दी केली होती आणि प्रशासनानं या सगळ्याकडे काणाडोळा केल्याचंही दिसून आलं. आता मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार RSS च्या शाखा, सरसंघचालकांची घोषणा, निर्णयामागे ‘हा’ उद्देश चंपत राय यांची सुनावणी : दिल्लीपासून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रकूटमध्ये पाच दिवस झालेल्या या बैठकीदरम्यान संघाच्या वतीनं 8 जुलै आणि 12 जुलै रोजी दोन प्रसिद्धी पत्रकंही काढण्यात आली. यामध्ये संघाच्या बंद असलेल्या शाखा सुरू करणं, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतील संघाची भूमिका आणि संघटनेच्या कामकाजाबाबत चर्चा होत असल्याचं म्हटलं होतं. संघाच्या कामकाजाविषयी चर्चा होत असेल तर देशाच्या संसदेबाहेर नसते इतकी सुरक्षा इथं कशासाठी आणि माध्यमांवर एवढी बंधनं का असा प्रश्न या टीमला पडला. त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यांना पहिली बातमी मिळाली ती अशी की, या बैठकीत राम जन्मभूमी ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांची सुनावणी झाली मात्र त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत संघ समाधानी नव्हता. तरीही त्यांना माफ करण्यात आलं. कारण उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीत या प्रकरणावरून वाद निर्माण होऊ नये अशी संघाची इच्छा आहे. ‘चादर आणि फादर मुक्त भारत’ : त्यानंतर या टीमनं काही संतांची (Saint) भेट घेतली ज्यांची भेट संघाचे मोठ मोठे पदाधिकारी घेत होते. संत आणि संघ यांचं नातं दृढ असल्याचे अनेक अनुभव आल्याचं या टीमनं म्हटलं आहे. एका संताच्या मदतीनंच त्यांना या बैठक स्थानी जाण्याची परवानगी मिळाली. 11जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता बैठक स्थानाच्या अगदी जवळ असलेल्या संशोधन संस्थेत ही टीम पोहोचली, मात्र इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पोलीस यंत्रणेशी संघर्ष करावा लागला. या गोपनीय बैठकीतील सर्वात गुप्त अजेंडा त्यांच्या हाती लागला. संघाच्या एका सूत्राने त्यांना फोनवरील एका ओळीचा संदेश दाखवला. हा संदेश होता की, ‘आता आपल्याला ‘चादर मुक्त आणि फादर मुक्त भारत’ बनवायचा आहे.’ या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. कोरोनाची तिसरी लाट अटळ? वैज्ञानिकांनी दिले ‘हे’ इशारे, आताच सावध व्हा, अन्यथा... त्यानंतर या टीमनं सतनाचे कॉंग्रेस आमदार आणि पीडब्ल्यूडी मंत्री आणि भाजपचे चित्रकूटचे आमदार चंद्रिका प्रसाद उपाध्याय यांची भेट घेतली. या दरम्यान संघाच्या आणखी एका सूत्राचीही भेट झाली. त्यांनीही ‘चादर आणि फादर मुक्त भारत’ या चर्चेसह बैठकीतील काही महत्त्वाच्या घडामोडींचे फोटो दाखवले. कॉंग्रेसचे आमदार नीलांशू चतुर्वेदी यांनीही बैठक स्थळ आपल्या विधानसभा मतदार संघात येत असल्यानं आपण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, मात्र अद्याप काहीही उत्तर मिळालं नसल्याचं सांगितलं. ते भेटतील अशी अपेक्षा नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. संघाचे एक जुने आणि कट्टर कार्यकर्ते असलेले भाजपचे आमदार चंद्रिका प्रसाद यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी धर्म परिवर्तनाचे 4 किस्से ऐकवले आणि भारतीय संस्कृती वाचवायची असेल तर धार्मिक परिवर्तनाविरूद्ध लढाई सुरू केली पाहिजे, असं सांगितलं. भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय, विम्बल्डन बघितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आशा संघाच्या गुप्ततेबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा प्रश्न आजही लागू : भारताचे पहिले राष्ट्रपती (India’s First President Dr. Rajendra Prasad) डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही संघाच्या गुप्ततेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी 12 डिसेंबर 1948 रोजी सरदार पटेल यांना एक पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘या संस्थेला घटना नाही. त्याची उद्दिष्टे आणि ध्येयधोरणं योग्यरित्या परिभाषित केलेली नाहीत. केवळ विशिष्ट लोकांना विश्वासात घेतले जाते. संस्थेच्या कार्यक्रमांची नोंद ठेवली जात नाही. यासाठी कोणतेही रजिस्टर नाही. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा हा प्रश्न आजही तितकाच लागू आहे. संघाच्या बैठका इतक्या गुप्त का असतात? त्यांना इतके कडक सुरक्षा कवच का दिले जाते? हे प्रश्न आजही पडतात.
  First published: