मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची तिसरी लाट अटळ? वैज्ञानिकांनी दिले ‘हे’ इशारे, आताच सावध व्हा, अन्यथा...

कोरोनाची तिसरी लाट अटळ? वैज्ञानिकांनी दिले ‘हे’ इशारे, आताच सावध व्हा, अन्यथा...

देशातील बहुतांश राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार पोषक असून त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक बळावत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 13 जुलै : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of corona) प्रभाव ओसरत असल्याचं चित्र असलं तरी देशातली काही भागात अद्यापही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याचं चित्र आहे. मात्र देशातील बहुतांश राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी (tourism) बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार पोषक असून त्यामुळे तिसरी लाट (Third wave) येण्याची शक्यता अधिक बळावत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

तिसरी लाट अटळ

पहिल्या दोन लाटांचं स्वरूप पाहता तिसरी लाट येणं अटळ असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळले आणि काळजी घेतली, तर या लाटेची तीव्रता कमी राखण्यात यश येऊ शकतं. मात्र दुसऱी लाट ओसरल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या प्रकारची बेफिकिरी दिसत आहे, ती चिंताजनक असून तिसऱ्या लाटेचं गांभिर्य वाढवणारी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनीही दिला इशारा

इंडियन मेडिकल असोसिएशनने ही चिंता व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील विनामास्क फिरणाऱ्यांना इशारा दिला होता. पर्यटनस्थळी होणारी गर्दी चिंताजनक असून ही एन्जॉय करण्याची वेळ नसल्याचं मोदींनी म्हटलं होतं. ईशान्य भारतातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी पर्यटन आणि कोरोना यांची सांगड कशी घालता येईल, याबाबत सखोल चर्चा केली होती.

WHO नं व्यक्त केली चिंता

डेल्टा व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेनंही वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आगमन झालं असून या व्हायरसच्या क्षमतेबद्दल सध्या विविध देशांत संशोधन सुरू आहे. आतापर्यंत तरी लसीकरण न झालेल्या नागरिकांना नवा व्हेरिअंट अधिक घातक ठरत असल्याचं दिसून येत असून वेगानं लसीकरण होणं, हाच तिसऱ्या लाटेवरचा उपाय असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचा -मुंबईकरांना 21 दिवसांतच कोरोना सुरक्षा कवच; 28 दिवस प्रतीक्षा करण्याची गरज नाही

तिसरी लाट सुरू झाल्याचा दावा

दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसात मृत्युंचा आकडा वाढला असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या निष्कर्षावर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, India