• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • मोठी बातमी: आता मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार RSS च्या शाखा, सरसंघचालकांची घोषणा, निर्णयामागे ‘हा’ उद्देश

मोठी बातमी: आता मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार RSS च्या शाखा, सरसंघचालकांची घोषणा, निर्णयामागे ‘हा’ उद्देश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा यापुढे मुस्लिम मोहल्ल्यांमध्येदेखील सुरु करण्यात येतील, अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

  • Share this:
    कोलकाता, 13 जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS Shakha) शाखा यापुढे मुस्लिम मोहल्ल्यांमध्येदेखील (Muslim areas) सुरु करण्यात येतील, अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदूंप्रमाणे मुस्लिमांनाही सहभागी करून घेण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणं पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्याची तीन खंडात विभागणी जकरण्यात आली असून प्रत्येक विभागात वेगवेगळे पदाधिकारी नेमले जाणार आहेत. मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेशक संघटना आहे, हा संदेश देण्यासाठी मुस्लिम विभाग आणि मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर केला आहे. चित्रकुटमध्ये पार पडलेल्या चिंतन शिबीराची मंगळवारी सांगता झाली, त्यावेळी भागवत बोलत होते. RSS ही हिंदुंची संघटना असली तरी त्याचे दरवाजे सर्व धर्मियांसाठी खुले आहेत, हा संदेश देण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालची विभागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अधिक चांगलं काम करता यावं, यासाठी बंगालची तीन भागात विभागणी करणार असल्याचं ते म्हणाले. दक्षिण बंगाल, मध्य बंगाल आणि उत्तर बंगाल असे तीन भाग करण्यात येणार असून कोलकाता, वर्धमान आणि सिलीगुडी या ठिकाणी त्यांची मुख्यालयं उभारण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. हे वाचा - 'या' राज्यातील OBC आरक्षणात कपात, 27 पैकी 14 टक्केच आरक्षण सुरु ठेवण्याचे आदेश संघटनेतील जबाबदाऱ्यांमध्ये बदल भय्याजी जोशी हे यापुढं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेचे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर प्रदीप जोशी यांच्याकडं अखिल भारतीय सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते चंदीगढमधील मुख्यालयातून आपलं काम सुरू ठेवणार आहेत. तर डॉ. कृष्ण गोपाल यांच्याकडं विद्या भारतीच्या संपर्क प्रमुख पदाचं काम सोपवण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published: