मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय, विम्बल्डन बघितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आशा

भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय, विम्बल्डन बघितल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आशा

Corona Virus In India:  भारतात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एक आशा व्यक्त केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 14 जुलै: भारतात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एक इच्छा व्यक्त केली आहे. इंग्लंडप्रमाणे (England) भारतातही (India) लोकांना मास्कशिवाय (Without Mask) फिरताना बघायचंय, असं मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) मंगळवारी म्हटलं आहे.

मंगळवारी राज्यातल्या कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकारच्या तयारीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्स्फरसिंगद्वारे सुनावणी पार पडली.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं रविवारी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीचं उदाहरण दिलं आहे. विम्बल्डनच्या अंतिम लढतीच्या वेळी तिथल्या क्रिडा रसिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सर्व प्रेक्षक सेंटर कोर्टवर विनामास्क होते. त्या लढतीचा आनंद प्रेक्षक विनामास्कनं घेत होते. तसाच आनंद आपल्या भारतातल्या लोकांच्या चेहऱ्यावर बघायचा आहे. भारतातल्या लोकांनाही मास्कशिवाय फिरताना बघायचं असल्याचं  मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- स्पष्ट सांगा!, शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केला 'हा' थेट सवाल

विम्बल्डनच्या अंतिम लढतीच्या वेळी सेंटर कोर्टवर उपस्थित एकाही प्रेक्षकानं मास्क घातलं नव्हतं. संपूर्ण सेंटर कोर्ट प्रेक्षकांनी भरलेलं होतं. यावेळी या अंतिम लढतीच्या वेळी सेंटर कोर्टवर एका भारतीय क्रिकेटपटूनं तसंच बॉलिवूडच्या अभिनेत्रीनंही हजेरी लावली होती. त्यांनीही मास्क घातलेलं नव्हतं.  ही गोष्ट न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर भारतात विनामास्कची वेळ कधी येणार? भारतातील नागरिक पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगणार? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. त्यावर सर्व नागरिकांचे लसीकरण ही त्यामागची एकमेव गुरुकिल्ली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, The Bombay High Court