मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी: Ropeway मध्ये 11 लोक अडकले; शेकडो फूट उंचीवर NDRF चं रेस्क्यू ऑपरेशन सुरू, थरारक VIDEO

मोठी बातमी: Ropeway मध्ये 11 लोक अडकले; शेकडो फूट उंचीवर NDRF चं रेस्क्यू ऑपरेशन सुरू, थरारक VIDEO

मोठी बातमी: हिमाचल प्रदेशात रोपवेमध्ये 11 लोक अडकले ; NDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

मोठी बातमी: हिमाचल प्रदेशात रोपवेमध्ये 11 लोक अडकले ; NDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

या रोपवेमध्ये सुमारे तासभर हे लोक हवेत अडकले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच NDRF चे पथक घटनास्थळी पोहोचले असून तातडीने बचावकार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले आहे.

दिल्ली, 20 जून:   हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) सोलनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील परवानू ट्रिंबर ट्रेल रोपवेमध्ये (Parwanoo Trimber Trail Ropeway) तब्बल 11 लोक अडकल्याची घटना घडली आहे. सुमारे तासभर हे लोक हवेत अडकले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची (NDRF) टीम घटनास्थळी पोहोचली असून रोपवेमध्ये अडकलेल्या 8 जणांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित 3 जणांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून सुटका करण्यात आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोमवारी दुपारी हिमाचल प्रदेशच्या परवानू येथे 11 लोकांना घेऊन जाणारी ट्रॉली मधोमध गेल्यावर अचानक थांबली. शेकडो फूट उंचीवर थांबलेल्या केबल कारमध्ये 11 जण अडकल्याचे समजताच सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला. घटनेची माहिती मिळताच लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलली गेली. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. आतापर्यंत 11 पैकी 8 जणांची सुटका करण्यात यश आले असून तीन लोक अजूनही अडकले आहेत. दरम्यान या घटनेने एप्रिलमध्ये झारखंडच्या देवघरमध्ये घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. देवघरमध्ये रोपवेवर केबल कार एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. या दुर्घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: MLC Election UPDATES : विधान परिषदेची मतमोजणी रखडणार? निकाल उशिराने लागण्याची चिन्ह

केबल कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी केबलवर एक बचाव ट्रॉली तैनात करण्यात आली होती, असे सोलन जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले. अडकलेल्या 11 पैकी आठ जणांची सुटका करण्यात आली. “टिंबर ट्रेल ऑपरेटरची टेक्निकट टीम तैनात करण्यात आली आहे आणि पोलिसांचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,” असे पोलीस अधीक्षकांनी ANI ला सांगितले.

रोपवे केबल कारच्या यापूर्वीच्या काही दुर्घटना:

1. गुलमर्ग गोंडोला क्रॅश (GULMARG GONDOLA CRASH )-

जून 2017 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग येथील स्की-रिसॉर्टमध्ये रोपवे तुटल्याने केबल कार खाली कोसळल्याने दिल्लीतील एका कुटुंबातील चार सदस्य आणि तीन पर्यटक मार्गदर्शकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे एक झाड गुलमर्ग गोंडोलाच्या रोपवेवर उन्मळून पडले. त्यामुळे रोपवे तुटून केबल कार जमिनीवर कोसळली होती.

2. छत्तीसगडमध्ये ट्रॉली अपघात (TROLLEY ACCIDENT IN CHHATTISGARH)-

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगढ भागात एका मजुराचा रोपवे ट्रॉली टॉवरवर आदळून मृत्यू झाला होता. भक्तांना केबल कारमधून बमलेश्वरी देवी मंदिरात नेण्यासाठी 1,300 मीटर लांबीच्या रोपवेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

हेही वाचा: OMG! एका महिलेने तब्बल 69 मुलांना दिला जन्म; VIRAL PHOTO मागील नेमकं सत्य काय?

3. जम्मू केबल कार अपघात (JAMMU CABLE CAR CRASH)-

जानेवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाच्या काही दिवस आधी, मॉक ड्रिल दरम्यान बांधकामाधीन जम्मू रोपवे प्रकल्पाची केबल कार क्रॅश झाल्याने दोन कामगार ठार झाले आणि चार जण जखमी झाले. महामाया मंदिराजवळ काही तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली.

4. झारखंड रोपवे अपघात (JHARKHAND ROPEWAY ACCIDENT)-

या वर्षी एप्रिलमध्ये बैद्यनाथ धाम मंदिरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या त्रिकुट हिल्स येथे रोपवेच्या बिघाडामुळे टेकड्यांवर ट्रॉली आदळल्याने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

First published:
top videos

    Tags: Himachal pradesh, Rescue operation