मुंबई, 20 जून : प्रेग्नन्सीच्या बऱ्याच बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात एका महिलेने तब्बल 69 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला जातो (Woman With 69 Babies). सर्वाधिक मुलांना जन्म देणारी महिला म्हणून या महिलेचा रेकॉर्ड असल्याचंही सांगितलं जातं आहे. महिलेसोबत तिच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे (Woman Gve Birth To 69 Babies). एक महिला आणि एक पुरुष यांच्यासोबत बरीच मुलं, असा हा फोटो फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या फोटोवर दिलेल्या माहितीनुसार ही एक रशियन महिला आहे. जिचं नाव वसील्येवा असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिने आपल्या आयुष्यात एकूण 69 मुलांना जन्म दिला होता. 16 वेळा जुळी, 7 वेळा तिळी आणि 4 वेळा एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला होता. हे वाचा - VIDEO : व्यक्तीचं लक्ष नसताना अचानक मागून आला भलामोठा सिंह आणि…; कॅमेऱ्यात कैद झालं भयंकर दृश्य पण खरंच या महिलेने सर्वाधिक मुलांना जन्म दिल्याचा रेकॉर्ड केला होता? व्हायरल होणाऱ्या या फोटोबाबत जो दावा केला जातो आहे. त्यामागे कितपत सत्य आहे याची तपासणी करण्यात आली.
या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेजचा वापर करण्यात आला. त्यानुसार हा फोटो 2005 साली उटाह हिस्टोरिक क्वाटर्लीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार हा फोटो 1904 साली घेण्यात आला. या फोटोतील दिसणारा एक पुरुष जोसफ एफ स्मिथ आहे आणि यात त्याच्या पत्नी आणि मुलं आहे. यात रशियाच्या महिलेचा उल्लेख कुठेच नाही. याशिवाय इंटरनॅशनल फॅक्ट चेक साइट स्नोपसनेही या फोटोची सत्यता पडताळली त्यांनाही असे काही पुरावे मिळाले नाहीत. हे वाचा - Shocking! जन्मानंतर 2 वर्षांतच चिमुकला ‘तरुण’ झाला; प्रायव्हेट पार्टमधील बदल पाहून डॉक्टरही शॉक या फोटोत असं लिहिलं आहे की या महिलेचं नाव रेकॉर्डमध्ये आहे. जेव्हा रेकॉर्ड बुक तपासण्यात आलं तेव्हा अशा कोणत्याच महिलेचं नाव यात नाही. बऱ्याच वेबसाईट्सवर या महिलेच्या रेकॉर्डबाबत माहिती देण्यात आली आहे. पण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अशा नावाच्या कोणत्या महिलेचा उल्लेख नाही.