रोहतक, 16 एप्रिल : देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. त्याच वेळी, लोकांनी परदेशात जाण्यासही मनाई आहे. अशा परिस्थितीत एका रोहतकच्या मुलानं परदेशी महिलेसोबत विवाह केला आहे.रोहतकमध्ये राहणाऱ्या निरंजन कश्यपची तीन वर्षांपूर्वी मेक्सिकन मुलीशी ऑनलाइन मैत्री झाली होती.
आता लॉकडाऊनमध्ये दोघांनीही सोमवारी रात्री आठ वाजता रोहतकच्या जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात लग्नाचे विधी पूर्ण केले. त्यांचं लग्न लॉकडाऊनमुळे अडकले होतं. मात्र अखेर निरंजन कश्यप यांनी उपायुक्त आर.एस. वर्मा यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला व रात्री आठ वाजता त्यांच्यासाठी कार्यालय उघडण्यात आले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.
तीन वर्षांपूर्वी स्पॅनिश शिकत असताना निरंजन आणि डॅनी यांची मैत्री झाली. दोघांमध्ये एवढी जवळीक वाढली की त्यांनी विशेष विवाह अधिनियम (Special Marriages Act )अंतर्गत विवाह करण्याचे ठरवले. डॅना आणि तिची आई 11 फेब्रुवारी रोजी भारतात आले होते. लगेचच त्यांनी विशेष विवाह अधिनियम अंतर्गत अर्ज केला. 30 दिवसांनी लॉकडाऊनमध्ये हा विवाह पार पडला.
वाचा-पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! संगीत दिग्दर्शकाची अनोखी सेवा
Haryana: Niranjan Kashyap from Rohtak married Dana, a Mexican national on April 13 under the Special Marriage Act amid #CoronavirusLockdown. Niranjan says, "We met through a language learning app. Dana&her mother came to India on 11th February for the wedding." pic.twitter.com/Q9QKjMsDTH
— ANI (@ANI) April 15, 2020
वाचा-मैत्रीचे बंध! मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण
खरंतर 18 मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार होत होता. त्यातच 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. अखेर 13 एप्रिल रोजी त्यांना जिल्हाधिकारी बोलवून घेतले आणि विवाह झाला. डॅनी सध्या रोहतकमध्ये निरंजनच्या आई वडिलांसोबत राहत आहे. तर डॅनीच्या आईला पुन्हा मायदेशी पाठवण्याची विनंती तिनं केली आहे, मात्र लॉकडाऊनमध्ये विमान उड्डाणे बंद असल्यामुळं त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे.
वाचा-कोण म्हणतंय कोरोनाला हरवू शकत नाही?वडिलांना पक्षघात असतानाही आई-मुलाने जग जिंकलं
2017मध्ये झाली होती मैत्री
निरंजन आणि मेक्सिकन वंशाच्या मुलगी डॅना झोहेरी ऑलिव्हेरोस क्रूझशी 2017 मध्ये ऑनलाइन स्पॅनिश भाषेच्या कोर्स दरम्यान मैत्री झाली. निरंजनने आधी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला होता. यानंतर त्यांनी ऑनलाइन भाषेच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला. 2017 मध्ये, तो मुलीला भेटण्यासाठी मेक्सिकोलाही गेला होता.
संकलन, संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona