मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोण म्हणतंय कोरोनाला हरवू शकत नाही? वडिलांना पक्षघात असतानाही आई-मुलाने जग जिंकलं!

कोण म्हणतंय कोरोनाला हरवू शकत नाही? वडिलांना पक्षघात असतानाही आई-मुलाने जग जिंकलं!


डिस्चार्ज मिळ्यानंतर या कुटुंबाने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आभार मानले.

डिस्चार्ज मिळ्यानंतर या कुटुंबाने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आभार मानले.

डिस्चार्ज मिळ्यानंतर या कुटुंबाने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आभार मानले.

नागपूर, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. एकीकडे आकडा वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर हरवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. नागपूरमधील एका कुटुंबातील तिघा जणांनी कोरोनाला मात दिली आहे. विशेष म्हणजे, यात वडिलांना पक्षघात होता.

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी 3 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आई, वडील आणि मुलगा कोरोनामुक्त झाले आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 11 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, वडिलांना पक्षाघात झाला होता. त्या स्थितीतही त्यांनी कोरोनाशी लढा दिला. यात त्यांना  डॉक्टरांची मोठी मदत झाली.

हेही वाचा - ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा धोका वाढवणारी घटना

या कुटुंबातील तिघांना जणांना कोरोनाची लागण झाली होती. भावाला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या संपर्कात आल्यामुळे कुटुंब प्रमुख असलेले  45 वर्षीय वडील कोरोनाबाधित झाले. त्याचा भाऊ कोरोनाबाधित रुग्णाच्या दुकानात काम करीत होता, त्यामुळे त्याला लागण झाली होती. वडिलांचे नमुने 29 मार्च रोजी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांची 44 वर्षीय पत्नी आणि 14 वर्षीय मुलाचे नमुने तपासले असता 30 मार्च रोजी दोघेही पॉझिटिव्ह आले. या तिघांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

दाखल केल्यानंतर सातव्या दिवशी आणि 14 दिवसांनंतर 24 तासांच्या कालावधीत तपासलेले तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे तिघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - वांद्रे गर्दी प्रकरणावरून भाजपच्या नेत्याने केला नवा दावा, व्हिडिओ केला प्रसिद्ध

डिस्चार्ज मिळ्यानंतर या कुटुंबाने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आभार मानले. डॉक्टरांचे उपचार, त्यांनी दिलेल्या हिंमतीमुळे आपण बरे होऊ शकलो, सकारात्मक ऊर्जा ठेवली तर कोरोनावर विजय मिळवू शकतो, अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली.  या तिघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरीही पुढील 14 दिवस त्यांना घरीच राहावे लागणार आहे.

नागपूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आणि औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-19’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी 56 वर पोहोचली. गेल्या 3 दिवसांत 27 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. असं असताना 3 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Nagpur