मैत्रीचे बंध झाले घट्ट! लॉकडाऊनमध्ये मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण

मैत्रीचे बंध झाले घट्ट! लॉकडाऊनमध्ये मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण

सैफुद्दीनने जेव्हा भिख्खू मित्राला फोन केला तेव्हा त्याला दोन वेळेचं जेवण मिळणं कठीण झालं होतं

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : देशात लॉकडाऊन (Lockdown) असल्याने अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अशीच एक घटना मुंबईतील ठाण्यात घडली आहे. येथे एका व्यक्तीने केवळ दोस्तीचं प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे तर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या बौद्ध भिख्खू मित्राला खाण्याचं सामान पोहोचवलं आहे.

दोघांमधील मैत्रीचे बंध

मुंबई मिररमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार तीन वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान सैफुद्दीनची भेट बौद्ध भिख्खू लोबसांग रिचेन यांच्याशी झाली होती. त्यादरम्यान दोघांनी एकमेकांचा मोबाइल नंबर घेतला. दोघेही फेसबूकवर मित्र बनले. अनेकदा ट्रेनमध्ये त्यांची भेट व्हायची. सैफुद्दीन एक व्यापारी होते. काही दिवसांनंतंर त्यांचा ट्रेन प्रवास बंद झाला होता. रिचेनदेखील चार बौद्ध भिख्खूसह ठाण्यातील एका विहारात राहू लागले आणि मुंबई विद्यापीठात राजकीय शास्त्र या विषयावर अभ्यास करू लागले.

बौद्ध भिख्खू हे भिक्षेच्या स्वरुपात मिळालेल्या पदार्थांतूनच पोट भरतात. मात्र लॉकडाऊनमध्ये लोकांचं मंदिर, विहारात येणं बंद झालं. यामुळे पाचही भिख्खूची हालत खराब झाली. त्यांना दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं.

मित्राने ठेवली आठवण

काही दिवसांपूर्वी सैफुद्दीनच्या मुलाने 500 हून अधिक लोकांसाठी खाण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा सैफुद्दीनला रिचनची आठवण आली. जेव्हा त्यांनी रिचेनला फोन लावला तेव्हा त्यांच्या खाण्याचे आबाळ होत असल्याचे त्याला कळले. यावेळी सैफुद्दीनने रिचेनला विचारलं मी काय मदत करू, तेव्हा रिचेन म्हणाला तांदूळ, डाळ आणि तेल हवंय.

सैफुद्दीनने सांगितले की, जेव्हा मी मदतीचा विचार केला तेव्हा कोणीही सामान पोहोचवण्यासाठी तयार नव्हता. बऱ्याच विनवणीनंतर शब्बीर भगोरा आपल्या बाइकने सामानघेऊन जाण्यास तयार झाला. त्यानंतर सैफुद्दीनने 15 दिवसांपर्यंत पूरेल इतकं रेशन पाठवलं.

संबंधित - लॉकडाउन नियमांचा फज्जा, रेल्वे कर्मचारी जीव धोक्यात घालून करताय काम!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा 100 टक्के पाऊस चांगला होणार

 

 

First published: April 15, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या