मराठी बातम्या /बातम्या /देश /पेट्रोल-डिजेलच्या किमती वाढल्या म्हणून रॉबर्ट वाड्रा ऑफिसला निघाले सायकलीवरुन; अर्थमंत्र्यांना म्हणाले...

पेट्रोल-डिजेलच्या किमती वाढल्या म्हणून रॉबर्ट वाड्रा ऑफिसला निघाले सायकलीवरुन; अर्थमंत्र्यांना म्हणाले...

देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी ऑफिसला जाण्यासाठी सायकलचा (went office by bicycle) वापर केला आहे.

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतचं (petrol and diesel prices hike) चालले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या खिशावर भार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर (Opposition attack on Central govt) जोरदार हल्ला चढवला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या अनुषंगाने कॉंग्रेस पक्षाने (Congress) सरकारला पुरतं घेरलं आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी ऑफिसला जाण्यासाठी सायकलचा (went office by bicycle) वापर केला आहे. ऑफिसकडे जात असताना त्यांनी न्यूज 18 शी खास बातचीत केली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनीही इंधनाच्या वाढत्या किमतीवरून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'या घडीला सरकार सामान्य जनता आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. ही एक मोठी समस्या आहे. यामुळेच मी आज सायकलवरून ऑफिसला जात आहे.' यावेळी त्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, अर्थमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणीही केली आहे. विद्यमान केंद्र सरकार सर्वसामान्यांचा जराही विचार करत नाही. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी आपल्या घरापासून ते कार्यालयापर्यंत सायकलने प्रवास केला आहे.

हे ही वाचा-नारायण स्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश

याच विषयावरून प्रियांका गांधींनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं की, 'भाजप सरकारने आठवड्याच्या त्या दिवसाचं नाव 'अच्छे दिन' ठेवावं, ज्या दिवशी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्या नाहीत. कारण महागाईमुळे उर्वरित दिवस सर्वसामान्यांसाठी 'महागडे दिवस' ठरत आहेत.

हे ही वाचा-गुलाम नबी आझादांसाठी भाजपनं अंथरलं ‘रेड कार्पेट’, वाचा काय प्रकार आहे...

याव्यतिरिक्त देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने देशातील अनेक ठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला आहे. इंधनाचे आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

First published:

Tags: BJP, Congress, Modi government, Petrol and diesel price, PM narendra modi, Priyanka gandhi vadra, Robert vadra