पदुच्चेरी, 22 फेब्रुवारी : पदुच्चेरीमध्ये (Puducherry Floor Test Live) काँग्रेसचं भविष्य निश्चित करण्यासाठी सोमवारी सकाळी एक दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झालं. मुख्यमंत्री नारायण स्वामी (V Narayanasamy) यांनी विश्वासदर्शक ठराव सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संसदेत त्यांच्या सरकारकडे बहुमत असल्याचं सांगितलं. परंतु नारायण स्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावादरम्यान बहुमत गमावलं. नारायण स्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने काँग्रेसने दक्षिण भारतामधील शेवटचं राज्य गमावलं आहे. माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि भाजपच्या केंद्र सरकारवर त्यांनी सरकार पाडण्याचा आरोप केला आहे. पदुच्चेरीचे नवनियुक्त राज्यपाल तमिलीसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री व्ही, नारायणस्वामी यांना विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताधारी क्राँग्रेस-द्रमुक आघाडीतील बहुमत गमावल्याचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हे निर्देश दिले आहेत.
(वाचा - भाजपची हाय व्होल्टेज बैठक, 5 राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी अॅक्शन प्लॅन ठरला! )
Puducherry CM V.Narayanasamy loses trust vote in Assembly, government falls pic.twitter.com/iFVE9g7jvf
— ANI (@ANI) February 22, 2021
रविवारी काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायण आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेश यांनी राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या कमी होऊन 11 झाली. तर विरोधी पक्षाचे 14 आमदार आहेत. (वाचा - छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती ) माजी मंत्री ए. नमसिवायम (आता भाजपमध्ये असलेले) आणि मल्लाडी कृष्ण राव यांच्यासह काँग्रेसच्या चार आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. तर नारायणस्वामी यांचे जवळचे मानले जाणारे ए जॉन कुमार यांनीही या आठवड्यात राजीनामा दिला होता.