मराठी बातम्या /बातम्या /देश /गुलाम नबी आझादांसाठी भाजपनं अंथरलं ‘रेड कार्पेट’, वाचा काय प्रकार आहे...

गुलाम नबी आझादांसाठी भाजपनं अंथरलं ‘रेड कार्पेट’, वाचा काय प्रकार आहे...

काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर आवाज उठवणारे पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azhad) यांची भाजप (BJP) सोबत वाढलेली जवळीक हा चर्चेचा विषय बनली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर आवाज उठवणारे पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azhad) यांची भाजप (BJP) सोबत वाढलेली जवळीक हा चर्चेचा विषय बनली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर आवाज उठवणारे पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azhad) यांची भाजप (BJP) सोबत वाढलेली जवळीक हा चर्चेचा विषय बनली आहे.

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावर आवाज उठवणारे पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azhad) यांची भाजप (BJP) सोबत वाढलेली जवळीक हा चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यसभेत आझाद कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निरोपाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील भावुक झाले होते. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा नेते आणि आझाद यांच्यातील जवळीकतेचं दर्शन झालं. अल्पसंख्यांक मंत्रालयानं (Ministry of Minority Affairs) आयोजित केलेल्या 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या शेरोशायरीच्या कार्यक्रमात मोदी सरकारनं आझाद यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं होतं.

सरकारी कार्यक्रमात आझाद यांचं पोस्टर -

आत्मनिर्भरतेच्या दिशेनं देशाची सुरू असलेल्या वाटचालीवर आधारित हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुख्तार अब्बास नकवी आणि डॉ. जितेंद्र सिंह या दोन केंद्रीय मंत्र्यांसह आझाद देखील उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आझाद यांचंही पोस्टर लावण्यात आलं होते. मोदी सरकारच्या एखाद्या कार्यक्रमात एखाद्या काँग्रेस नेत्याचं पोस्टर लावण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांसोबत आझाद यांची उपस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. डॉ. जितेंद्र सिंह आणि गुलाम नबी आझाद हे दोन्ही नेते जम्मू काश्मीरमधील आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदी सरकारचं गेल्या महिनाभरातील आझाद यांच्याबद्दलचं बदललेलं रुप सर्वांनी दुसऱ्यांदा पाहिलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत मोदींनी त्यांची जोरदार प्रशंसा केली. मोदींना भाषणाच्या दरम्यान अश्रूही अनावर झाले होते. मोदींनी आझाद यांची जोरदार प्रशंसा केल्यानं ते लवकर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती.

( वाचा : '... त्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करेन', गुलाम नबी आझाद यांनी सांगितली वेळ! )

गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ द्यायचा कोणताही निर्णय काँग्रेसने घेतला नाही. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहित काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचाही समावेश होता. या पत्राचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होते.

First published:

Tags: BJP, Congress, Gulam nabi azad, India, Modi government, Pm narenda modi