मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /छोट्या गावात राहणाऱ्या आणि शेंगदाणे विकणाऱ्याच्या मुलानं केलं चक्क वर्ल्ड रेकॉर्ड

छोट्या गावात राहणाऱ्या आणि शेंगदाणे विकणाऱ्याच्या मुलानं केलं चक्क वर्ल्ड रेकॉर्ड

हुशारी ही कधीच कुणाची मक्तेदारी नसते. हा छोट्या गावातला गरिबाघरचा मुलगा 1 मिनिट 58 सेकंदांमध्ये UN यादीतल्या सगळ्या 196 देशांची (countries) नावं घडाघडा म्हणून दाखवतो.

हुशारी ही कधीच कुणाची मक्तेदारी नसते. हा छोट्या गावातला गरिबाघरचा मुलगा 1 मिनिट 58 सेकंदांमध्ये UN यादीतल्या सगळ्या 196 देशांची (countries) नावं घडाघडा म्हणून दाखवतो.

हुशारी ही कधीच कुणाची मक्तेदारी नसते. हा छोट्या गावातला गरिबाघरचा मुलगा 1 मिनिट 58 सेकंदांमध्ये UN यादीतल्या सगळ्या 196 देशांची (countries) नावं घडाघडा म्हणून दाखवतो.

डेहराडून, 21 जानेवारी : विद्वत्ता, हुशारी (wisdom) ही नेहमीच शिक्षणातून येते असं आपल्यापैकी अनेकांना वाटत असतं. मात्र या समजाला छेद देत थक्क करणारं एक उदाहरण आपल्याच देशात समोर आलं आहे.

उत्तराखंडच्या (Uttarakhand) उधमसिंह नगर जिल्ह्यातील एका अतिशय सामान्य माणसाच्या मुलानं हा समज मोडून काढला आहे. या मुलाचं नाव आहे अभिषेक चंद्रा. या अभिषेकचं नाव आता थेट इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (International book of record) नोंदवलं गेलं आहे. अमर उजालानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या अभिषेकचे वडील शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करतात. ते आणि त्यांचं कुटुंब उत्तराखंडमध्ये रंपुरा या अतिशय छोट्याशा गावात राहतात. अभिषेकनं काय कमाल केली तर, त्यानं केवळ 1 मिनिट 58 सेकंदांमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (united nations organizations) यादीत नोंदणीकृत असलेल्या सगळ्या 196 देशांची (countries) नावं घडाघडा म्हणून दाखवली.

रंपुराच्या वॉर्ड 23 च्या एका अतिशय गरीब वस्तीत राहणाऱ्या अभिषेक चंद्राच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्याचे वडील राजकुमार चंद्रा हे गांधी पार्कमध्ये शेंगदाण्याचा गाडा लावतात. पैशांच्या अडचणीमुळं (economical problems) अभिषेकसुद्धा सकाळी पेपरही (newspaper) टाकायला जातो. त्यातून तो आपल्या ट्युशनचा (tuition) खर्च भागवतो. तो आदित्यनाथ झा इंटर कॉलेजमध्ये अकरावीचा विद्यार्थी आहे.

अभिषेक सांगतो, की वृत्तपत्रात आलेलं एका व्यक्तीबाबतचं प्रेरक वृत्त वाचून त्यालाही रेकॉर्ड (record)बनवण्याची प्रेरणा मिळाली. लॉकडाऊनमध्ये अभिषेकनं जगातील देशांची नावं पाठ करणं सुरू केलं होतं. त्यानं काही काळानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा ऑनलाईन फॉर्म भरला. त्यानंतर त्यानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून संबंधित लोकांना व्हीडिओही पाठवला.

त्यानंतर चार टप्प्यात त्याची परीक्षा घेण्यात आली. त्यात यशस्वी झाल्यानंतर हा सन्मान अभिषेकच्या वाट्याला आला. त्याला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचं प्रमाणपत्र आणि मेडल पाठवण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Record, Uttarakhand