मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आनंदवार्ता! हे विषाणूतज्ज्ञ कोरोनाच्या साथीबद्दल जे सांगत आहेत, ते वाचून मिळेल मोठा दिलासा

आनंदवार्ता! हे विषाणूतज्ज्ञ कोरोनाच्या साथीबद्दल जे सांगत आहेत, ते वाचून मिळेल मोठा दिलासा

'कोरोनाची साथ (pandemic) आता तिच्या अगदी अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यातच ही साथ 'एंडेमिक फेज' (Endemic phase) मध्ये प्रवेश करेल.'

'कोरोनाची साथ (pandemic) आता तिच्या अगदी अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यातच ही साथ 'एंडेमिक फेज' (Endemic phase) मध्ये प्रवेश करेल.'

'कोरोनाची साथ (pandemic) आता तिच्या अगदी अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यातच ही साथ 'एंडेमिक फेज' (Endemic phase) मध्ये प्रवेश करेल.'

नवी दिल्ली, 22 जानेवारी : सध्या कोरोनानं (corona) सगळ्यांचंच आयुष्य पूर्णतः व्यापलं आहे. मात्र आता कोरोना कधी संपेल याबाबत एक खूप आशादायक आणि अभ्यासपूर्ण निरीक्षण एका तज्ज्ञानं (expert) नोंदवलं आहे.

'इंडिया टुडे'नं केलेल्या सविस्तर ईमेल-मुलाखतीमध्ये याबाबतचं भाष्य डॉ. टी. जेकब जॉन (Dr. T Jacob John) यांनी केलं आहे. डॉ. टी जेकब जॉन हे भारतातील आघाडीचे विषाणूतज्ञ (virologist) आहेत. जेकब यांच्या मते कोरोनाची साथ (pandemic) आता तिच्या अगदी अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यातच ही साथ 'एंडेमिक फेज' (Endemic phase) मध्ये प्रवेश करेल.

डॉ. जेकब म्हणतात, की सध्याचं चित्र असं दिसतं आहे, की कोरोनाची साथ संपण्याच्या टप्प्यावर आहे. आणखी एक-दोन महिन्यातच स्थिती सामान्य अवस्थेच्या जवळपास पोचलेली असेल. सध्या व्हायरसचा संसर्ग (infection) रोखण्याहून व्हायरसामुळं होणारे मृत्यू रोखणं अधिक तातडीचं बनलं आहे. जे आधीच गंभीर रोगांनी ग्रस्त आहेत त्यांना कोरोनापासून वाचवलं गेलं पाहिजे. शिक्षणसंस्थांमध्येही खूप तातडीनं लस (vaccine) उपलब्ध केली गेली पाहिजे.

भारतात बायोटेकच्या (Bharat biotech) लशीबाबत अनेक वाद सुरू आहेत. याचा वापर करण्याची परवानगी आणि त्याबाबतचा वाद याविषयी विचारलं असता जेकब सांगतात, 'या लसीच्या वापराबाबत अनेक तज्ञ संभ्रमात आहेत. आणि तो संभ्रम अगदीच समजण्यासारखाही आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) या लसीबाबत रेस्ट्रिक्टेड, इमर्जन्सी, इन ट्रायल असे शब्दप्रयोग केले आहेत. हे स्पष्ट आहे, की भारत सरकार कोविशिल्डला अगदी आरामात वापराची परवानगी देणार आहे. मात्र कोवॅक्सिनला केवळ आणीबाणी तत्वावरील वापराची परवानगी आहे. अर्थात, जबाबदारी कंपनीवरच आहे. या लसीकरणापूर्वी संमतीपत्र आणि अंडर फेज थ्री ट्रायलची गोष्ट जाहीर केली गेली पाहिजे. लस बनवण्याची पद्धत अपवादात्मकरित्या अभूतपूर्व आहे. पण ही परिस्थितीही तशी आहेच.

पुढे ते म्हणतात, मला जर दोन्ही लसी समोर ठेवल्या आणि एक निवडायला सांगितली तर मी पहिली पसंती कोवॅक्सिनला देईन. मात्र केवळ कोव्हीशील्ड उपलब्ध असेल तर मी तीही घेईनच. कोवॅक्सिनबाबतची उपलब्ध माहिती समजून घेतल्यानंतर मी या लसीबाबत जास्त आश्वस्त आहे.

सध्या लोक बहुसंख्येनं मास्क न घालता फिरत आहेत. शिवाय मॉल्स आणि चित्रपटगृहंसुद्धा उघडली गेलीत. सरकारनं हे योग्य पाऊल उचललंय का याबाबतचं मत विचारलं असता डॉ. जेकब सांगतात, 'यात धोका आहे तसे याचे फायदेही आहेतच. मात्र दोन्हीचा मध्यममार्ग साधला पाहिजे. मात्र सुरक्षेबाबत बोलायचं तर, सतत सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरणं याला पर्याय अजूनतरी दिसत नाही.

भारत सरकार आणि जनसामान्यांना सल्ला देताना डॉ. जेकब आवर्जून सांगतात, की मला एड्सचा नवानवा काळ आठवतो. त्यावेळी आपण व्यावहारिक पातळीवरचे बदल आणि सावधगिरी यामाध्यमातून विजयी झालो होतो. कोरोनाशी लढतानाही हीच आपली ताकद ठरेल. नियमांकडं दुर्लक्ष करणं ही आपल्या देशात सर्रास आढळणारी सवय आहे. हे टाळलंच पाहिजे.

First published:

Tags: Corona virus in india, Mask, Vaccine