नवी दिल्ली, 30 मार्च : देशातील सर्व प्रदेशांमध्ये जम्मू-काश्मीर कायमच चर्चेत राहिलं आहे. मोदी सरकारच्या काळात या प्रदेशात बरेच बदल झाले आणि हे बदल चांगले आहेत, असं जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले. नेटवर्क 18 च्या न्यूज 18 रायझिंग इंडिया समिटमध्ये ते आले होते. रायझिंग इंडियाच्या मंचावर त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कसे बदल झाले आहेत, ते सांगितलं.
मनोज सिन्हा म्हणाले, ई-गवर्नेंस आणि यूटी रँकिंगमध्ये जम्मू-कश्मीर नंबर 1 वर आहे. जम्मू-कश्मीरमध्ये इंड्रस्ट्री येत आहेत. 32 वर्षांनंतर राजकीय बस सेवा सुरू होत आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये खुल्या जागेत शौच पूर्णपणे बंद झालं आहे. 100 डोर टू डोर गार्बेज कलेक्शन होतं. जल जीवन मिशन 58 टक्क्यांपेक्षा अधिकवर पोहोचतं आहे. टॅक्स रेव्हेन्यूमध्ये 31 टक्के झालं आहे. आतापर्यंत 19 लाख ट्रान्झॅक्शन झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव, अमित शाह यांचा सर्वात मोठा खुलासा
पंतप्रधान मोदी यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये चांगले बदल पाहायला मिळत आहेत, असं मनोज सिन्हा म्हणाले.
रायझिंग इंडिया समिट 2023
न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने 'रायझिंग इंडिया समिट 2023' या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचा विषय आहे 'द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया'. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.
संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. आज संमेलनाचा दुसरा दिवस सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Jammu and kashmir, PM Modi