मुंबई : गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द होण्यापासून ते भारत जगात पहिल्या नंबरवर कसा पोहोचेल त्यासाठी कशा पद्धतीने गोष्टी करायचा विचार आहे याबाबत अनेक मुद्द्यांवर रायझिंग इंडियामध्ये खुलासा केला.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसने केंद्रीय एजन्सीचा कसा गैरवापर केला, एका खोट्या गुन्हात नरेंद्र मोदींना अडकवण्याचा कसा डाव होता यावर त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, तपास एजन्सी त्यांची चौकशी करत असताना सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील एका कथित बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी अमित शाह यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातील ही घटना असल्याचं त्यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी सरकार त्यांना अडकवण्यासाठीकेंद्रीय एजन्सींचा “दुरुपयोग” करत होत्या असा गंभीर आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी ‘न्यूज 18 रायझिंग इंडिया’ कार्यक्रमात केला आहे. यावेळी त्यांनी विरोधक कोणत्या थराला जाऊन हे सगळं करत होते याची पोलखोलही केली.
काँग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुम्ही टेन्शन घेऊन नका तुम्ही नरेंद्र मोदींचं नाव सांगून टाका असं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता.
'राहुल गांधीच भाजपाला जिंकवून देणार', Rising India मध्ये केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
राहुल गांधींवर काय म्हणाले अमित शाह
काँग्रेस नेते भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षेला आणि दोषाला स्टे करायला 3 महिन्यांचा वेळ मिळायचा. कनव्हिक्शन स्टे करता येत नाही, शिक्षा स्टे करता येते. पण थॉमस केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांचं प्रावधान काढून टाकलं.
लालूंना वाचवण्यासाठी मनमोहन सरकार अध्यादेश घेऊन आले. पण तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला. तो अध्यादेश असता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती.
राहुल गांधींनी अजूनही या निकालाला आव्हान दिलेलं नाही, त्यांच्यात कोणता अहंकार आहे? लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह 17 जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का? असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
ते कायदा वाचणार नाहीत, त्यांना समजणारही नाही. पण काँग्रेसकडे राज्यसभेत बसणारे मोठे वकील आहेत, तेही काही समजावत नाही. लोकसभा अध्यक्षही काही करू शकत नाहीत. ज्या वेळी तुम्ही दोषी ठरलात तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं, असं अमित शाह म्हणाले.
त्यांना मोदी विरुद्ध राहुल करूदे, भाजपसाठी विजयाचा यापेक्षा मोठा फॉर्म्युला कोणता असेल? त्यांनी फक्त मोदींना नाही, तर मोदी समाज म्हणजेच तेली समाजाविषयी ते बोलले. सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच का असतं? असं ते म्हणाले. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, असा आरोप अमित शाह यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Congress, Rahul gandhi