Home /News /national /

5G, Jio ग्लास, TV, JioMart...हे आहेत आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

5G, Jio ग्लास, TV, JioMart...हे आहेत आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

या बैठकीत मुकेश अंबानी महत्त्वपूर्ण घोषणा करत आहे. या बैठकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जाणून घ्या.

    मुंबई, 15 जुलै: कोरोना व्हायरसमुळे पहिल्यांदाच या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाइन घेण्यात आली आहे. RILचे सर्व भागिदार आपापल्या घरातूनच लॉगइन करतील. त्यामुळे देशभर आणि जगात विविध जवळपास 500 ठिकाणांहून व्हर्च्युअली एकत्र येत ही वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या बैठकीत मुकेश अंबानी महत्त्वपूर्ण घोषणा करत आहे. 1. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये Googleची गुंतवणूक फेसबुक, सिल्वर लेक सारख्या जवळपास 11 कंपन्यांनी जिओमध्ये भागीदारी घेतल्यानंतर आता गुगलही जिओसोबत करार करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. Google जिओमध्ये 7.7 टक्के 33, 737 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. संबंधित-रिलायन्सकडून मोठी बातमी! फेसबुकनंतर Google करणार JIO मध्ये मोठी गुंतवणूक 2. O-to-C बिझनेस प्लॅन या बैठकीमध्ये रिलायन्स समुहाच्या रिटेल बिझनेस ग्रोथ संदर्भात सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे O-to-C बिझनेस प्लॅनबाबत माहिती देण्यात येईल. जाणकारांच्या मते या बैठकीमध्ये कंपनी Aramco करारासंदर्भात माहिती देऊ शकतात. मॉर्गन स्टेनली यांच्या मते आजच्या एजीएममध्ये O-to-C बिझनेसमधील भागीदारी विक्रीच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात येईल. संबंधित-रेकॉर्ड स्तरावर पोहोचले रिलायन्सचे शेअर, आज होणाऱ्या AGMमध्ये होऊ शकतील या घोषणा 3. जिओ 5G रोडमॅपचे अनावरण रिलायन्स समुहाकडून जिओ 5G रोडमॅपचे अनावरण करण्यात आले, जे पूर्णपणे भारतामध्ये विकसीत करण्यात आले आहेत. जिओ 5Gची ही सेवेचे 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर करण्यात येईल. 2021 पासून ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध होईल, दरम्यान इतर देशांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 'भारतामध्ये पूर्णपणे विकसीत करण्यात आलेल्या सुविधा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची वेळ आता आली आहे', अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. संबंधित-रिलायन्सने केली 'JIO आत्मनिर्भर 5G'ची घोषणा, 2021 पासून ग्राहकांना मिळणार सेवा जिओ स्मार्ट ग्लास जिओ 5G बरोबर जिओनं स्मार्ट ग्लास नावाचा एक चश्माही लॉंच केला आहे. मुख्य म्हणजे या चश्म्याच्या मदतीनं तुम्हाला 3D भेटीचा अनुभव घेता येणार आहे. या चश्म्याला JioGlass असे नाव देण्यात आले आहे. यात स्पीकर आणि माइक दोघांचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट ग्लासच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे. भारतात आतापर्यंत ही भन्नाट सेवा देणारी जिओ पहिली कंपनी आहे. या ग्लासचे आज अनावरण करण्यात आले. 4.रिटेलमध्ये काही नवा उपक्रम रियान्स जिओ आता रिटेलमध्ये काही नवा उपक्रम सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे JioMart या नव्या ई कॉमर्स व्यवसायाची मोठी घोषणाही आज होऊ शकते.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Google, Mukesh ambani, Reliance

    पुढील बातम्या