Home /News /money /

रिलायन्सने केली 'JIO आत्मनिर्भर 5G'ची घोषणा, 2021 पासून ग्राहकांना मिळणार सेवा

रिलायन्सने केली 'JIO आत्मनिर्भर 5G'ची घोषणा, 2021 पासून ग्राहकांना मिळणार सेवा

जिओ प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी घोषणा रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (RIL Chairman Mukesh Ambani) यांच्याकडून करण्यात आली आहे. रिलायन्स समुहाकडून जिओ 5G रोडमॅपचे अनावरण करण्यात आले

    नवी दिल्ली, 15 जुलै : रिलायन्स समुहाची 43वी एजीएम सध्या सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ऑनलाईन AGM होत आहे. जिओ प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी घोषणा रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (RIL Chairman Mukesh Ambani) यांच्याकडून करण्यात आली आहे. रिलायन्स समुहाकडून जिओ 5G रोडमॅपचे अनावरण करण्यात आले, जे पूर्णपणे भारतामध्ये विकसीत करण्यात आले आहेत. जिओ 5Gची ही सेवेचे 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर करण्यात येईल. 2021 पासून ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध होईल, दरम्यान इतर देशांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 'भारतामध्ये पूर्णपणे विकसीत करण्यात आलेल्या सुविधा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची वेळ आता आली आहे', अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. (हे वाचा-रिलायन्सने केली 'JIO आत्मनिर्भर 5G'ची घोषणा, 2021 पासून ग्राहकांना मिळणार सेवा) जिओ प्लॅटफॉर्म 'आत्मनिर्भर भारत'साठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरेल अशी घोषणा यावेळी अंबानी यांनी केली. मार्केट कॅपच्या हिशोबाने देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समुहाच्या (Reliance Industries Ltd.) एजीएममध्ये कंपनीच्या मेगा फ्यूचरसंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. जिओ 5 जी सुविधांमुळे भारतात इंटरनेटचा वापर सुलभ होईल.  या घोषणेसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे - जिओने अगदी मुळापासून संपूर्ण 5G सोल्यूशन डिझाइन केले आणि विकसित केले आहे -स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर मेड इन-इंडिया टेक्नॉलॉजी एका वर्षात उपयोजित आणि लाँच केली जाऊ शकते. -जिओ आपले 4 जी नेटवर्क सहजपणे 5G वर श्रेणी सुधारित करू शकते, कारण ते सर्व आयपी नेटवर्क आर्किटेक्चर आहे (हे वाचा-ALERT! ग्राहकांना बँकेतून आलेला फोन असू शकतो मोठा फ्रॉड, अशाप्रकारे घ्या जाणून)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या