Home /News /money /

RIL AGM 2020 Live Updates : रेकॉर्ड स्तरावर पोहोचले रिलायन्सचे शेअर, AGMमध्ये होऊ शकतील या घोषणा

RIL AGM 2020 Live Updates : रेकॉर्ड स्तरावर पोहोचले रिलायन्सचे शेअर, AGMमध्ये होऊ शकतील या घोषणा

रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी फेसबुकसारख्या टेक दिग्गजांबरोबर करण्यात आलेल्या भागीदारीचा फायदा घेण्यासंदर्भात मोठ्या घोषणा करू शकतात.

    नवी दिल्ली, 15 जुलै : रिलायन्स समुहाची 43 वी एजीएम (RIL 43rd AGM 2020) आधीच कंपनीचे शेअर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. बुधवारी आरआयएलचे शेअर (Reliance Industries Share Price) जवळपास 1.5 टक्क्यांनी वाढून जवळपास 2000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. याआधी मंगळवारी हे शेअरचे दर 1917 रुपयांवर बंद झाले होते. 23 मार्च रोजी 52 आठवड्यांच्या लो 867 रुपयांपासून शेअरमध्ये जवळपास 125 टक्के तेजी आली आहे. ती वाढ 4 महिन्यांपेक्षाही कमी कालावधीमध्ये झाली आहे. रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industry Chairman Mukesh Ambani) फेसबुकसारख्या टेक दिग्गजांबरोबर करण्यात आलेल्या भागीदारीचा फायदा घेण्यासंदर्भात मोठ्या घोषणा करू शकतात. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, एजीएममध्ये मुकेश अंबानी शेअरधारकांसमोर रिलायन्स समुहामध्ये तेलाला रसायनामध्ये बदलण्याच्या मोठ्या योजनेबद्दलही माहिती देतील. जिओ प्लॅटफॉर्मची लिस्टिंग, 5G संदर्भात होऊ शकतात मोठ्या घोषणा जिओला जगभरातील गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या कमालीच्या प्रतिसादानंतर आता जिओ प्लॅटफॉर्मच्या लिस्टिंगबाबत घोषमा होऊ शकते. कंपनी गुंतवणूक वाढवण्यासाठी इंटरनॅशनल मार्केटमध्ये लिस्टिंग करणार असल्याचे संकेत याआधीही कंपनीने दिले आहेत. त्याचप्रमाणे जिओ फायबर आणि 5G शी संबंधितही काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. इंडिट्रेड कॅपिटलचे सुदीप बंडोपाध्याय यांनी बिझनेस स्टँडर्डला अशी माहिती दिली आहे की, कंपनी यासंदर्भात माहिती देईल की, जिओ प्लॅटफॉर्म संदर्भात समुहाच्या नेमक्या योजना काय आहेत. ते म्हणाले की, 'लिस्टिंगच्या टाइमलाइनबरोबर हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की याची लिस्टिंग भारतीय स्टॉक एक्सचेंजवर होईल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये होईल'. (संबंधित-LIVE: RILची आज महत्त्वपूर्ण बैठक, मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता) कंपनीच्या क्वालकम व्हेंचर्सच्या गुंतवणूकीनंतर अनालिस्टचे असे म्हणणे आहे की, कंपनी 5G रोलआउटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. . क्वालकॉम व्हेंचर्स, क्वालकॉमचे ग्लोबल फंड आहे, जे जगभरातील 5G, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑटोमोटिव्ह, नेटवर्किंग आणि एंटरप्राइजमध्ये काम करणाऱ्या उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. त्याचप्रमाणे या एजीएममध्ये मार्केट ही माहिती जाणून घेण्यास इच्छित आहे की, कंपनी सध्या कोणत्या उदयोन्मुख व्यवसायाकडे लक्ष ठेवून आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ऑनलाईन AGM होणार आहे. Coronavirus च्या साथीच्या धोक्यामुळे सर्व भागिदार आपापल्या घरातूनच लॉगइन करतील. त्यामुळे देशभर आणि जगात विविध ठिकाणांहून व्हर्च्युअली एकत्र येत ही वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. जगभरातल्या 500 वेगवेगळ्या ठिकाणाहून या AGM साठी लोक log in करतील. RIL च्या AGM मध्ये आज महत्त्वाच्या घोषणा मुकेश अंबानी करण्याची शक्यता आहे. यामध्ये 5G सेवेची घोषणा होऊ शकते. रियान्स जिओ आता रिटेलमध्ये काही नवा उपक्रम सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे JioMart या नव्या ई कॉमर्स व्यवसायाची मोठी घोषणाही आज होऊ शकते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance group

    पुढील बातम्या