मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्याचा नवा विक्रम, एकाच दिवशी 10 लाखांहून अधिक Vaccination; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्याचा नवा विक्रम, एकाच दिवशी 10 लाखांहून अधिक Vaccination; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Maharashtra new record in vaccination: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच राज्यानं लसीकरणात (Corona Vaccination) वेगळा विक्रम केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 22 ऑगस्ट: राज्यात (Maharashtra State) कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच राज्यानं लसीकरणात (Corona Vaccination) वेगळा विक्रम केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये राज्यानं शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली.

लसीकरण मोहिमेत शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5 हजार 200 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून 10 लाख 96 हजार 493 नागरिकांना लस देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यंत दिलेल्या डोसची संख्या 5 कोटींवर गेली आहे. लसीकरणात संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्यानं ही विक्रमी कामगिरी केली आहे. ( Maharashtra State Vaccination Latest Update )

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा प्लान

शनिवारी दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्यानं केला आहे. एकाच दिवसात जवळपास 11 लाखांच्या आसपास नागरिकांना लसीकरण झाल्यानं या विक्रमाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही घेतली आहे. दोघांनीही आरोग्य यंत्रणेनं केलेल्या कामाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, दिवसाला 10 लाखांपेक्षा अधिक कोरोना लसीकरण केले जाऊ शकतं, हे आज महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केलं आहे. याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीनं अधिक प्रयत्न करण्यात येतील असंही टोपे यांनी सांगितलं.

लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद

शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभरात 10 लाख 96 हजार 493 नागरिकांचं लसीकरण झालं. आरोग्य विभागानं यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. याआधी 3 जुलैला 8 लाख 11 हजार नागरिकांना लस देऊन राज्यानं विक्रमी नोंद केली होती. त्यानंतर 14 ऑगस्ट दिवशी 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देत राज्यानं यापूर्वी विक्रम मोडून काढला होता.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Maharashtra News