अफगाणिस्तान, 22 ऑगस्ट: Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या 87 भारतीयांना( Indians) घेऊन विमान मायदेशी परतलं आहे. रविवारी सकाळी हे विमान दिल्लीत (Delhi) पोहोचलं. यातलं एक विमान कतारच्या दोहा, तर दुसरं ताजिकिस्तानची राजधानी दुसांबेहून येथे पोहोचलं. अफगाणिस्तातून घरवापसी करत असलेले भारतीयांनी (Indians in Afghanistan) जोरात भारत माताचे नारे दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यासह, त्यांनी हे देखील सांगितले की, नेपाळचे दोन नागरिक देखील विमानात उपस्थित आहेत. मंत्रालयाने सांगितले की, इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज रात्रीपर्यंत इतर 300 भारतीयांना सुखरूप त्यांच्या मायदेशी परत आणले जाईल.
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan Crisis) भारतीय समुदायाची उपस्थिती खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रियाही वेगवान केली आहे. भारत सातत्यानं हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने (Indian Government) आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसी (Evacuate) साठी दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
"Evacuation continues! IAF special repatriation flight with 168 passengers onboard, including 107 Indian nationals, is on its way to Delhi from Kabul," tweets MEA Spokesperson Arindam Bagchi.
— ANI (@ANI) August 22, 2021
(Pic Source: MEA Spokesperson) pic.twitter.com/MyKbwR3gKb
15 ऑगस्टला तालिबानद्वारे अफगाणिस्तानच्या (Afghanistan Crisis) काबूलमध्ये (Kabul) कब्जा केल्यानंतर हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकन आणि उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नाटोद्वारे केले जात आहे. अशातच भारताला या संघटनेच्या वतीने काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हेही वाचा- येत्या 24 तासात अशी असेल राज्यातील पावसाची स्थिती, वाचा सविस्तर सध्या काबूल विमानतळ (kabul Airport) पूर्णपणे अमेरिकी सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली आहे. नाटो सैन्याकडून सध्या 25 उड्डाणे काबूल येथून चालवली जात आहेत.