हैदराबाद, 09 ऑक्टोबर: तेलंगणामधील हैदराबाद शहरात शुक्रवारी अचानक कोसळलेल्या पावसामुळे (Hyderabad Heavy Rain) नागरिकांची त्रेधा-तिरपीट उडाली होती. संध्याकाळच्या वेळी अचानक, अनपेक्षित ढगफुटीने लोकांची धावपळ झाल्याचं अनेक भागात दिसलं. हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री रस्त्यांवर पूर (Flood in Hyderabad) आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान काही वाहून गेलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) देखील राबवावे लागले आहे. याठिकाणचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यांवरच काय काही हॉटेल्समध्ये देखील पाणी शिरलं आहे. हैदराबादमध्ये एरवी उष्मा आणि उबदारपणा असणारा दिवस शुक्रवारी मुसळधार पावसाने संपला. साधारण रात्री 8.30 च्या सुमारास पाऊस सुरू झाला होता आणि शहराच्या विविध भागांमध्ये सुमारे तासभर अविरत तीव्रतेने पाऊस कोसळत होता. हा पाऊस शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरुप देण्यासाठी पुरेसा होता. दरम्यान यावेळी झालेल्या पावसानंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये लेन, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जुन्या शहरातील ही दृश्ये आहेत.
#WATCH | Telangana: Lanes, roads submerged following incessant rainfall in Hyderabad. Visuals from the Old city. (08.10) pic.twitter.com/5XCGtsmIwt
— ANI (@ANI) October 8, 2021
हैदराबादच्या वनस्थलीपुरमच्या अनेक भागांना पावसाने झोडपलं होतं. यानंतर रस्त्यावरील परिस्थिती इतकी वाईट होती की लोकांना रस्ता ओलांडणं देखील कठीण जात होतं. दरम्यान एसीपी के पुरुषोत्तम यांनी दिलेल्या माहितीनुसार, , ‘मुसळधार पावसामुळे नाले ओसंडून वाहू लागल्यानंतर दोन व्यक्ती वाहून गेल्या आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत.’
#WATCH | Telangana: People struggle to cross a heavily waterlogged road after rain lashed several parts of Vanasthalipuram, Hyderabad. "Two persons have been washed away after nullahs overflowed due to heavy rains. Rescue team searching for them," said K Purushottam, ACP (08.10) pic.twitter.com/4RiAhA0EY2
— ANI (@ANI) October 9, 2021
रस्ते नाल्यांमध्ये बदलल्याने सर्वत्र वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वाहने रस्त्याच्या मधोमध थांबली होती आणि प्रवाशांना पाण्यातून ये -जा करणे कठीण झालं होतं. त्याचप्रमाणे काही हॉटेल्समध्ये पाणी शिरल्याची दृश्य देखील समोर आली आहेत.
#WATCH | Telangana: Rainwater entered a restaurant in Old City after incessant rains lashed Hyderabad, yesterday pic.twitter.com/ACLKd1Vb19
— ANI (@ANI) October 9, 2021
दरम्यान हे सर्व व्हिडीओ शुक्रवारी झालेल्या पावसानंतरचे आहेत. यानंतर दीर्घकाळासाठी वीज पुरवठा (Power Cut in Hyderabad) देखील खंडित झाला होता.

)







