नवी दिल्ली 8 जून: कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढल्यानंतर आणि रेमेडिसिव्हीर औषधाच्या वापरास मान्यता मिळाल्यानंतर भारतीय कंपन्या औषध तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत. आता कंपन्यांना ड्रग कंट्रोलर जनरलच्या मार्केटींग मंजूरीच्या प्रतीक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत रेमेडिसिव्हिर हे औषध उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागू शकेल. नियामक कंपनीने औषध कंपन्यांकडून विविध आकडे मागितले आहेत. या औषधाची चाचणी जलदगती आधारावर होईल, म्हणून एकदा ते मंजूर झाल्यानंतर यास एका महिन्यापेक्षा कमी वेळ लागेल, अशी माहिती पुढे आली आहे. पाच भारतीय कंपन्यांनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे रेमेडिसिव्हिर बाबतच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. भारतात कोविड -१९ च्या उपचारादरम्यान रेमेडिसिव्हिर ला वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. या पाच भारतीय कंपन्यांनी १२७ देशांमध्ये रेमेडिसिव्हिर औषधाची निर्मिती व वितरण करण्यासाठी गिलियड सायन्स बरोबर परवाना करार केला आहे. ड्रग रेग्युलेटरने गिलियड सायन्सला भारतात औषध निर्यात आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या पाच कंपन्यांकडून अभ्यास आणि चाचणी परवान्याशी संबंधित कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. स्टार्टर म्हणून काढा, व्हॉट्सअॅपवर मेन्यूकार्ड; कोरोनामुळे बदलली हॉटेलमधील सेवा दरम्यान, महाराष्ट्र सरकार बांगलादेशातून 10,000 रेमेडिसिव्हिर औषधांचे डोस खरेदी करीत आहे. स्थानिक कंपन्यांचे म्हणणे आहे की औषधे तयार करण्यासाठी कच्च्या मालापासून ते साठा करण्यासाठी सर्व काही आपल्याकडे आहे, परंतु नियामकांना औषधे तयार करण्याची मान्यता नाही ती मान्यता मिळाली तर औषध स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकणार आहे. हे वाचा - ‘वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं ' कुख्यात गुंडाला भररस्त्यात गोळ्या घालून केलं ठार; 7 दिवसांनी होतं लग्न
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.