कुख्यात गुंडाला भररस्त्यात गोळ्या घालून केलं ठार; 7 दिवसांनी होता लग्नाचा मुहूर्त

तो कारमधून बाहेर पडला तोच काहीजणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. भररस्त्यात हा रक्तरंजित थरार सुरू होता

तो कारमधून बाहेर पडला तोच काहीजणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. भररस्त्यात हा रक्तरंजित थरार सुरू होता

  • Share this:
    रोहतास, 8 जून : लॉकडाऊनच्या काळातही देशात अनेक ठिकाणांहून हत्येची प्रकरणं समोर आली आहेत. मुफ्तासिल पोलीस स्टेशन हद्दीतील बरडीह येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिप्पू पटेल असे मृताचे नाव आहे. तो करगार पोलीस स्टेशन परिसरातील भालुणीचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अनेक गुन्हे केले आहेत. आणि दोन गटांमधील वर्चस्वाच्या लढाईत त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. सोमवारी, सिप्पू पटेल आपल्या कुटुंबासमवेत एका रुग्णावर उपचार करवून  सासारामहून घरी परतत होता. दरम्यान, बाराडीह पुलाजवळ त्याची गाडी बंद पडली. त्याच्या गाडीचे टायर पंक्चर झाले होते. सिप्पू कारचे चाक बदलण्यासाठी खाली उतरला, त्याचवेळी शेजारुन दुचाकीवरुन येणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिप्पू पटेल याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक घटनांबाबत गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो तुरूंगातून बाहेर आला होता. सासारामच्या व्ही-मार्ट शॉपिंग मॉल लुटण्यात आले होते, ज्याचा मास्टरमाइंड सिप्पू पटेल हा होता. त्यानंतर मुफ्तासिल पोलीस स्टेशन परिसरातील आईस्क्रीम व्यावसायिकालाही गोळी घातली होती. तर एकदा सिप्पूने एका मेजवानीच्या कार्यक्रमात अचानक गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. कारगरमधील घोडीही येथे गुन्हेगारीची घटना घडत असताना त्याने दुचाकीला आग लावली होती. नंतर त्याला कारघर पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. 15 जून रोजी होता लग्नाचा मुहूर्त मृत सिप्पू पटेल यांचे 15 जून रोजी लग्न होणार होते. करुणहरच्या बरहरी ओपीच्या तंदुनीमध्ये विवाह ठरला होता. पण लग्नाच्या आठवडाभरापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली. घरी लग्नाची तयारी सुरू होती. रविवारी त्याच्या पुतण्याची अचानक प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कुटुंबासमवेत ते सासाराम येथे उपचारासाठी आले होते. उपचार करून परत येत असताना त्याची हत्या करण्यात आली. हे वाचा-गेल्या 4 दिवसांत मुंबई-पुण्यात 20000 प्रवासी दाखल; परप्रांतीय परतीच्या मार्गावर?
    First published: