पटना, 08 जून : हॉटेल (hotel), रेस्टॉरंटमध्ये (restaurant) गेल्यानंतर टेबलवर बसल्यावर सर्वात आधी आपण हातात घेतो ते मेन्यूकार्ड. मात्र आता टेबलवर हे मेन्यूकार्ड दिसणार नाही. शिवाय ऑर्डर घ्यायला कोणताही वेटर येणार नाही आणि स्टार्टर म्हणून बहुतेक हॉटेलमध्ये तुमच्या टेबलवर काढा येणार आहे. कोरोना लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांनी सुरू होणाऱ्या हॉटेल्सनी आता व्यवस्था बदलली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हॉटेल्सनी पूर्ण व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्ही आता हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला हॉटेलचं रूप बदललं दिसेल. न्यूज 18 ची टीम हॉटेलमध्ये पोहोचली आणि ग्राहकांसाठी कशी व्यवस्था केली गेली आहे हे पाहिलं. हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टना कमीत कमी 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागतं. यासाठी हॉटेल्सच्या प्रवेशद्वारापासून ते रिसेप्शनपर्यंत तशी सोय करण्यात आलेत. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनसाठी हँड सॅनिटायझर ठेवण्यात आलेत. लिफ्टमध्ये मर्यादित लोकंच जातील अशी व्यवस्था आहे. हे वाचा - कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सर्वात आधी काढा दिला जातो आहे. हा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे रेस्टॉरंट्सनी आता आपल्या मेन्यूत याचा समावेश केला आहे. टेबलवर बसल्यानंतर तुम्हाला तिथं मेन्यूकार्ड दिसणार नाही. कित्येक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी आपला मेन्यू कार्ड पेपरलेस केला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये येणाऱ्या ग्राहकांचा मोबाइल नंबर घेतला जातो आहे आणि त्यांना व्हॉट्सअपवर मेन्यू पाठवला जातो आहे. ऑर्डरदेखील मेसेजमार्फतच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही ऑर्डर केलेले जे काही पदार्थ असतील ते वेटर एका ट्रॉलीवर घेऊन येईल आणि ही ट्रॉली टेबलजवळ सोडून जाईल. ग्राहकांना स्वत:च ते सर्व्ह करून घ्यावं लागेल. क्लॉथ नॅपकिनऐवजी डिस्पोजेबल नॅपकिन ठेवण्यात आलेत. बिल भरण्यासाठी ई-वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. हे वाचा - कोरोनामुळे बदललं हॉटेल्स-रेस्टॉरंट्सचं रूप, पाहा PHOTO असं चित्र सध्या पटनामधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये आहे. मात्र बऱ्याच हॉटेलनी आपल्या सेवेत असे बदल केलेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







