24 नव्हे या तारखेपासून सुरू होणार लसीकरणासाठी नोंदणी, तारखेच्या गोंधळानंतर सरकारचं स्पष्टीकरण

24 नव्हे या तारखेपासून सुरू होणार लसीकरणासाठी नोंदणी, तारखेच्या गोंधळानंतर सरकारचं स्पष्टीकरण

Corona Vaccination Registration: 24 एप्रिलला नोंदणी सुरू होणार ही अफवा असून प्रत्यक्षात लसीकरणासाठी नोंदणी सुरू होणार असल्याची तारीख सरकारने कळवली आहे. वाचा सविस्तर

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : सरकारनं 1 मेपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) परवानगी दिली आहे. त्यामुळं आता या लसीकरणासाठी लोकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. या वयोगटातील नागरिकांचं प्रमाण अधिक असल्यानं आता लसीकरणासाठी नोंदणीबाबतही (corona vaccination registration) चर्चांना सुरुवात झाली आहे. लसीकरणासाठी नोंदणीला शनिवारी म्हणजे 24 एप्रिलपासून सुरुवात होणार अशी चर्चा होती. पण सरकारनं आता 24 नव्हे तर 28 एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.(corona vaccination registration to start from 28th April)

कोरोनाच्या लसीकरणासाठी 18 वर्षावरील सर्वांना सरकारनं पात्र केल्यानंतर आता यासाठी तयारी सुरू झाली आहे. नागरिकांमध्येही यासाठी उत्सुकता आहे. लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर तसंच आरोग्यसेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करता येणार आहे. 1

(वाचा - अवघे 105 वयमान : जिगरबाज आजोबांची कोरोनाला धोबीपछाड, 7 दिवसांत झाले ठणठणीत)

मे पासून सुरू होणाऱ्या या लसीकरणासाठी शनिवारी 24 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार, असं वृत्त अनेक ठिकाणी झळकलं. अनेक संकेतस्थळांनीही तसं वृत्त दिलं. मात्र आता सरकारनंच ही तारीख चूक असल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत सरकारच्या MyGovIndia या ट्विटर हँडलवर सरकारनं ही माहिती दिली आहे. 24 एप्रिलला नोंदणी सुरू होणार ही अफवा असून प्रत्यक्षात 28 एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

यावेळी लसीकरणाबाबात इतरही काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 1 मे पासून लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी स्वतःच नोंदणी करणं गरजेचं आहे. तसंच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी अ‍ॅडव्हान्स अपॉइंटमेंट घेता येईल. मात्र कोणालाही जाऊन नोंदणी न करता थेट लसीकरण करून घेता येणार नाही. रजिस्ट्रेशन cowin.gov.in आणि Aarogya Setu अ‍ॅपवर करता येईल अशीही माहिती देण्यात आली आहे.

(वाचा-Corona Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या सोपी पद्धत)

नोंदणी झाल्यानंतर संबंधित नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती मिळणार आहे. आपल्या आधार क्रमांकाच्या किंवा इतर ओळखपत्रांच्या आधारे तुम्हाला हे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करता येईल.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 5:58 PM IST

ताज्या बातम्या