Home /News /maharashtra /

अवघे 105 वयमान : जिगरबाज आजोबांची कोरोनाला धोबीपछाड, 7 दिवसांत झाले ठणठणीत

अवघे 105 वयमान : जिगरबाज आजोबांची कोरोनाला धोबीपछाड, 7 दिवसांत झाले ठणठणीत

या मराठवाड्यातल्या आजोबांनी तर पाच वर्षांपूर्वीच शंभरी पार केलेली. त्यांना कोरोनाने गाठलं तेव्हा कुटुंबीय चिंतेत होते. पण... मला काहीही होणार नाही असा आत्मविश्वास या आजोबांनी सुरुवातीपासूनच दाखवला.

लातूर, 20 एप्रिल : कोरोनामुळं एकीकडे तिशी-चाळीशीतील तरुण मृत्युमुखी (coronavirus death rate in maharashtra) पडत असतानाच लातूरमधून (Latur news) एक चांगली बातमी आली आहे. जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात लोदगा गावातील 105 वर्षाच्या आजोबांनी कोरोनाला अवघ्या सात दिवसांत (105 year old man defeated corona) धोबीपछाड दिली आहे. सकारात्मकता (Positive news corona) आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कोरोनाविरोधातला हा लढा (Covid warrior) सहज जिंकला. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये लोदगा हे गाव आहे. या गावात अंधारे कुटुंबामध्ये धोंडीराम अंधारे हे 105 वर्षे वयाचे आजोबा आहेत. गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या राक्षसानं या आजोबांनाही गाठलं. धोंडीराम यांना खोकला, ताप आणि दम लागणं अशी काही लक्षणं दिसून आली. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी त्यांची कोरोना चाचणी केली. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. आजोबांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना जास्त वय असलेल्यांसाठी अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात आजोबांनी तर पाच वर्षांपूर्वीच शंभरी पार केली. त्यामुळं वयोमानामुळं कुटुंबातील सर्व सदस्यांची चिंता प्रचंड वाढली. (वाचा-Pune News: नाशिक घटनेनंतर पुणे मनपा खडबडून जागी; खासगी रुग्णालयांसाठी नवा आदेश) आजोबांना कोरोना झाल्यानं सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. त्यामुळं लातूरच्या खासगी रुग्णालयात आजोबांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण सगळे घाबरलेले असतानाच आजोबा मात्र प्रचंड सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत होतं. 105 वर्षांच्या  आयुष्यात अनेक मोठ्या संकटाचा सामना करत त्यांनी परिस्थितीवर मात केली होती. त्यामुळं आपल्याला काही होणार नाही असा आत्मविश्वास त्यांना होता. या सकारात्मकतेचा फायदा म्हणजे नियमित उपचारालाही उत्तम प्रतिसाद देत होते. औषधींचा चांगला परिणाम दिसत होता. अगदी आजुबाजुला असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ते सकारात्मकतेनं बोलत होते. अखेर त्यांची सकारात्मकता कामी आली आणि कोरोनाला त्यांनी पराभूत केलं. (वाचा - Coronavirus 2nd Wave: असा मास्क लावाल तरच होईल फायदा; कुठला मास्क वापरायचा?) सात दिवसानंतर आजोबांची दुसऱ्यांदा कोरोना तपासणी झाली त्यावेळी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. विशेष म्हणजे आठ सदस्य असलेलं अंधारे यांचं सपूर्ण कुटुंबच कोरोनाशी लढा देत होतं. पण या जिगरबाद आजोबांच्या प्रेरणेनं त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब ठणठणीत झालं. तरुणालाही लाजवेल अशा धैर्यानं आजोबांनी कोरोनाला हरवलं. त्यामुळं ग्रामस्थांनादेखील त्यांचा अभिमान व कौतुक वाटलं नाही तरच नवल. अशाच सकारात्मकतेनं या संकाटाला सामोरं गेल्यास त्याला पराभूत करणं आणखी सोपं होईल हेच यावरून स्पष्ट होत आहे.

तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

Published by:News18 Desk
First published:

Tags: Coronavirus, Inspiration, Positive thinking, Success

पुढील बातम्या