Home /News /coronavirus-latest-news /

Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या नोंदणीची सोपी पद्धत

Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या नोंदणीची सोपी पद्धत

आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीनं कोविन अॅप (CoWin App) किंवा आरोग्य सेतूच्या माध्यमातून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन (Online Registration for Covid Vaccine) करू शकता. पाहूया घरबसल्या कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करता येईल.

    मुंबई 22 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे, तरुणांना लस दिली जावी, अशी मागणी होत होती. अशात सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेता येणार आहे. लसीकरणाच्या या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधी शनिवारपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. अशात आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीनं कोविन अॅप (CoWin App) किंवा आरोग्य सेतूच्या माध्यमातून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन (Online Registration for Covid Vaccine) करू शकता. पाहूया घरबसल्या कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करता येईल. असं करा रजिस्ट्रेशन - - सर्वात आधी www.cowin.gov.in वर लॉगइन करा. - यात आपला फोन नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा. - SMS द्वारे फोन नंबरवर OTP पाठवला जाईल. - OTP टाकून वेरिफाय बटणावर क्लिक करा. - ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर Registration of Vaccination पेज दिसेल. - या पेजवर आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. फोटो आयडी प्रुफ, फोटो आयडी नंबर, जन्म तारीख, लिंग याबद्दलची माहिती भरावी लागेल - डिटेल्स भरल्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या रजिस्टरवर क्लिक करा. - रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तसा मेसेज येईल. - एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर सिस्टम, अकाउंट डिटेल्स दाखवेल. - पेजच्या उजव्या बाजूला दिलेल्या Add More ऑप्शनवर क्लिक करुन याच मोबाईल नंबरने आणखी तुमच्या कोणत्या लोकांना लस घ्यायची आहे, त्यांना Add करता येईल. व्यक्तीचे डिटेल्स टाकून Add बटनवर क्लिक करावं लागेल. हेही वाचा -  1 मेपासून 18+ सर्वांना कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी स्टेप्स - - अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी अकाउंट डिटेल्स पेजने करू शकतो. त्यासाठी Schedule Appointment वर क्लिक करावं लागेल. - यानंतर Book Appointment for Vaccination पेजवर पोहोचाल. - त्यानंतर ड्रापडाउन केल्यावर राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड टाकावा लागेल. सर्च बटण क्लिक केल्यावर वॅक्सिनेशन सेंटरची यादी दिसेल. - सेंटरचं नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसेल. - त्यानंतर उपलब्ध स्लॉट (तारीख आणि कॅपेसिटी) दिसेल. - बुकवर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation पेज येईल. - त्यानंतर शेवटी डिटेल्स वेरिफाय करुन कन्फर्म बटणवर क्लिक करा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost

    पुढील बातम्या