मराठी बातम्या /बातम्या /देश /मुख्यमंत्र्यांनी बोलावली खासदारांची बैठक, राज यांच्या सभेला सशर्त परवानगी, मोदी सरकारच्या निर्णयाने पद्म पुरस्कारप्राप्त बेघर TOP बातम्या

मुख्यमंत्र्यांनी बोलावली खासदारांची बैठक, राज यांच्या सभेला सशर्त परवानगी, मोदी सरकारच्या निर्णयाने पद्म पुरस्कारप्राप्त बेघर TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 29 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला सशर्त परवानगी मिळाली आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सिल्वर ओक हल्ला प्रकरणात आरोपी वकील जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. तर मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांना सरकारी बंगल्यांतून बाहेर काढलं आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या बातम्या अवघ्या काही मिनिटांत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खासदारांना भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे. यामध्ये ते खासदारांना काय सूचना देतात हे महत्वाचे ठरणार आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा यांचा जामीन अर्ज

हनुमान चालिसा प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

सिल्वर ओक हल्ला प्रकरणात आरोपी वकील जयश्री पाटील यांची मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.

100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीवर मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात सुनावणी.

मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या याचिका दाखल करणार आहेत.

राज ठाकरेंच्या सभेला अटींवर परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे सभेला परवानगी मिळणार की नाही? याबाबत आज दुपारपर्यंत धाकधूक होती. अखेर पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

राज ठाकरे भेटणार योगी आदित्यनाथांना?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर शाब्दिक युद्ध रंगले आहे. पण दुसरीकडे, आता राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांची भेट घेणार अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

मास्कसक्तीवर आरोग्यमंत्र्यांचं उत्तर

कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहे. पण, दिल्लीसह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा मास्कसक्ती लागू होणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, अद्याप राज्यात मास्कसक्ती लावण्याचा कोणताही निर्णय नाही, असं स्पष्ट उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Yes Bank घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बिल्डरला बेड्या

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) आज महाराष्ट्रातील नामांकित बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) संजय छाबरियांना (Sanjay Chhabria arrested) अटक केली आहे. छाबरिया यांना Yes Bank-DHFL घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र दिनी भाजपची सभा

1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) भाजपने मुंबईत एक जाहीर सभा (BJP Rally in Mumbai) आयोजित केली आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल कऱण्यात येणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

आयुक्तांविरोधात किरीट सोमय्या हायकोर्टात जाणार

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनच्या (Khar Police Station) परिसरात जमावाने हल्ला केला. सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात त्यांना दुखापत सुद्धा झाली होती. या हल्ल्यानंतर पोलीस आपला एफआयआर घेत नसल्याचं म्हणत सोमय्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला होता. आता सोमय्या थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांना सरकारी बंगल्यांतून काढलं बाहेर

भारतरत्न, पद्मश्री (Padma Shri), पद्मभूषण(Padma Bhushan) आणि पद्मविभूषण (Padma Vibhushan) हे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. काहींना तर राहण्यासाठी नवी दिल्लीत सरकारी निवासस्थानंही देण्यात आलेली आहेत. मात्र, आता केंद्र सरकारनं ही निवासस्थानं रिकामी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra