जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Yes Bank घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बिल्डरला बेड्या

Yes Bank घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बिल्डरला बेड्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने आज महाराष्ट्रातील नामांकित बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) संजय छाबरियांना अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) आज महाराष्ट्रातील नामांकित बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) संजय छाबरियांना (Sanjay Chhabria arrested) अटक केली आहे. छाबरिया यांना Yes Bank-DHFL घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयकडून गेल्या दोन वर्षांपासून तपास सुरु आहे. विशेष म्हणजे संबंधित घोटाळ्याप्रकरणी संजय छाबरिया हे गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. सीबीआयने 15 फेब्रुवारीला त्यांच्या कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीत सीबीआयच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली होती. संजय छाबरिया हे तपासात सहकार्य करत नाहीत, असा आरोप सीबीआयकडून करण्यात येत होता. संजय छाबरिया हे रेडियस ग्रुपचे प्रमोटर आहेत. येस बँक घोटाळा प्रकरणात छाबरिया यांचं नाव समोर आल्यानंतर सीबीआयने रेडियस डेव्हलपमेंटच्या मुंबई आणि पुण्यासह तब्बल 15 जागांवर छापा टाकला होता. याशिवाय छाबरिया यांच्याशी संबंधित काही वैयक्तिक ठिकाणीदेखील सीबीआयने छापेमारी केली होती. खरंतर रेडियस डेव्हलपर्सवर डीएचएफएलचे सुमारे 3000 कोटी रुपयांचे कर्ज होते. पण त्याची परतफेड कंपनीला करता आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यांद्वारे सीबीआय अशा लोकांवर कारवाई करत आहे ज्यांनी येस बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाची परतफेड केली नाही. कारण बँकेकडून दिलेले कर्ज न मिळाल्याने बँकेचा एनपीए वाढला आणि आरबीआयला बँकेच्या कामकाजावर बंधने आणावी लागली होती. ( मुख्यमंत्रीपदासाठी भाजपलाच शिवसेनेसोबत युती नको होती? आता एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ) येस बँक घोटाळ्याप्रकरणाचा ईडीने देखील तपास केला आहे. याशिवाय ईडीने 2020 मध्ये येस बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर आणि इतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. राणा कपूर यांनी नियमांचं उल्लंघन करत कर्ज दिले. त्यांच्या या कृत्यामुळे समोरच्या कंपनीच्या आरोपींना त्यांच्या कुटुंबियांच्या संबंधित कंपन्यांमध्ये पैशांची गुंतवणूक केली, असं ईडीने चार्जशीटमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे ईडीला या प्रकरणात पैशांच्या अफरातफरचेही पुरावे मिळाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात