मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदी सरकारचा अजब निर्णय, पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांना सरकारी बंगल्यांतून काढलं बाहेर

मोदी सरकारचा अजब निर्णय, पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांना सरकारी बंगल्यांतून काढलं बाहेर

पद्मपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलाकारांवार होणाऱ्या या कारवाईबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पद्मपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलाकारांवार होणाऱ्या या कारवाईबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पद्मपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलाकारांवार होणाऱ्या या कारवाईबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : भारतरत्न, पद्मश्री(Padma Shri), पद्मभूषण(Padma Bhushan) आणि पद्मविभूषण(Padma Vibhushan) हे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. काहींना तर राहण्यासाठी नवी दिल्लीत सरकारी निवासस्थानंही देण्यात आलेली आहेत. मात्र, आता केंद्र सरकारनं ही निवासस्थानं रिकामी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कलाकारांना बेघर व्हावं लागलं आहे. याची सुरुवात ओडिसी नृत्यकलेतील महान कलाकार (Odissi Dance Exponent) गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut) यांच्यापासून झाली आहे. मंगळवारी (26 एप्रिल 22) दुपारी राऊत यांच्या घरातलं सामान सरकारी अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांचं वितरण होतं. कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मोठ्या सन्मानानं वागवलं जातं. त्यांना अनेक सरकारी सुविधांचाही लाभ दिला जातो. काहींना तर राहण्यासाठी नवी दिल्लीत सरकारी निवासस्थानंही देण्यात आलेली आहेत. मात्र, आता केंद्र सरकारनं ही निवासस्थानं रिकामी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली जवळील एशियाड व्हिलेजमधील ही निवासस्थानं 1980 च्या दशकात पद्म पुरस्कारप्राप्त कलाकारांना देण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कलाकारांना बेघर व्हावं लागलं आहे. याची सुरुवात ओडिसी नृत्यकलेतील महान कलाकार (Odissi Dance Exponent) गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut) यांच्यापासून झाली आहे. मंगळवारी (26 एप्रिल 22) दुपारी राऊत यांच्या घरातलं सामान सरकारी अधिकाऱ्यांकडून रस्त्यावर टाकण्यात आलं. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (पोलिसांची धाड जीवावर बेतला, ह्रदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू) 91 वर्षीय गुरू मायाधर राऊत यांना ओडिसी नृत्याला अभिजात दर्जा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल राष्ट्रपतींनी (President) 2010 मध्ये पद्मश्री (Padma Shri) पुरस्कारानं गौरवलं होतं. 70च्या दशकापासून, 40 ते 70 वयोगटातील कलाकारांना तीन वर्षांच्या मुदतीसाठी नाममात्र भाड्यानं घरांचं वाटप केलं जात होतं. त्यानंतर त्याचा कार्यकाल नियमितपणे वाढविला जात होता. 2014 मध्ये ही मुदतवाढ संपली होती. तेव्हापासून या घरांमध्ये राहणारे कलाकार आणि सांस्कृतिक मंत्रालयादरम्यान (Culture Ministry) सातत्यानं पत्र व्यवहार सुरू होते. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं 2020 मध्ये ही घरं रिकामी करण्यासाठी कलाकारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे दिवंगत कथ्थक कलाकार पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj), ध्रुपद वादक वसीफुद्दीन डागर (Wasifuddin Dagar), कुचीपुडी गुरू जयरामा राव आणि मोहिनीअट्टम कलाकार भारती शिवाजी यांच्यासह इतर काही कलाकारांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या मंगळवारी (26 एप्रिल) गृहनिर्माण मंत्रालयानं निवासस्थानं (Government House) रिकामी करण्याची कारवाई सुरू केली. पहिली कारवाई पद्मश्री प्राप्त (Padma Shri Awardee) गुरू मायाधर राऊत यांच्यावर झाली. त्यांची मुलगी आणि ओडिसी नृत्यांगना मधुमिता राऊत (Madhumita Raut) यांनी याबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. (विक्रेत्याला फोन नंबर मागण्याचा अधिकार नाही, MP मोईत्रा Decathlon वर का भडकल्या?) मधुमिता राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सरकारी अधिकारी कारवाईसाठी आले तेव्हा त्या मायाधर राऊत यांना जेवण वाढत होत्या. तरी देखील कारवाई झाली. या प्रकारामुळे मधुमिता प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत. 'गुरू मायाधर यांनी, सोनल मानसिंग (Sonal Mansingh) आणि राधा रेड्डी (Radha Reddy) यांसारख्या देशातील काही दिग्गज नर्तकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांनी दिल्लीत 50 वर्षे नृत्य शिकवण्याचं काम केलं. त्यांच्या नावे कुठेही एक इंचभर जमीनदेखील नाही. प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळवण्याचा अधिकार आहे. असं असून देखील माझ्या वडिलांसारख्या दिग्गज कलाकाराला अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे,' असंही मधुमिता राऊत म्हणाल्या. सध्या मधुमिता राऊत यांनी सर्वोदय एन्क्लेव्हमधील एका तळघरात आपलं आणि वडिलांचं सामान हलवलं आहे. ही जागा त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांच्या मालकीची आहे. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत इस्टेट संचालनालयातील (Directorate of Estates) एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'आमचं पथक सरकारी बंगले मोकळे करण्याची कारवाई करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार कलाकारांना या पुढे सरकारी बंगल्यांमध्ये राहता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयानंही (Delhi High Court) तो निर्णय कायम ठेवला आहे. पण, माणुसकीच्या नात्यानं या कलाकारांना घराबाहेर पडण्यासाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपली असून आम्ही त्यांना जागा सोडण्यास सांगितलं आहे. अशा 28 निवासस्थानांपैकी 17 निवासस्थानं रिकामी झाली आहेत तर काहीजण येत्या काही दिवसांत घर सोडून जाणार आहेत.' (उमेदवारांनो, JEE Mains साठी आताही करू शकता अप्लाय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया) मोहिनीअट्टम (Mohiniyattam ) कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या भारती शिवाजी (Bharati Shivaji) या आपल्या 98 वर्षीय आईसोबत सरकारी निवासस्थानात राहतात. भारती यांनाही घर सोडण्याच्या नोटिसा मिळाल्या होत्या. गुरु मायाधर यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मायाधर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर, भारती शिवाजी यांनी आपलं सामान पॅक करून स्टोरेज फॅसिलिटीमध्ये (Storage Facility) ठेवलं आहे. सध्या त्या दिल्लीमध्ये परवडेल असं अपार्टमेंट शोधत आहेत. 'मी एक कलाकार म्हणून या ठिकाणी आले होते. या जागेत मी तीन पुस्तकं लिहिली. अनेक विद्यार्थ्यांना नृत्य शिकवलं आणि आता मला येथून काढून दिलं जात आहे. कलाकार कधीही निवृत्त होत नाहीत. त्यांची भूमिका बदलते. सरकारनं त्यांची कदर करणं आवश्यक आहे, अशा शब्दांत भारती शिवाजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धृपद वादक वसीफुद्दीन डागर यांनीसुद्धा गुरुग्राममधील एका विद्यार्थ्याच्या पालकांच्या अपार्टमेंटमध्ये निवारा मिळवला आहे. 'सध्या आम्ही शास्त्रीय संगीताच्या (Classical Music) शिरोभागी नाहीत. त्यामुळे आमच्याकडे इतरांसारखा पैसाही नाही. परिणामी दिल्लीत परवडेल असं घर मिळवणं कठीण आहे. ही परिस्थिती माहिती असूनही सरकार ऐकण्यास तयार नाही, असं डागर म्हणाले. पद्मपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलाकारांवार होणाऱ्या या कारवाईबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
    First published:

    पुढील बातम्या