Home /News /mumbai /

भाजपचं ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा; शिवसेनेसह मविआला देणार कडकडीत डोस

भाजपचं ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा; शिवसेनेसह मविआला देणार कडकडीत डोस

भाजपचं ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा; शिवसेनेसह मविआला देणार कडकडीत डोस

भाजपचं ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा; शिवसेनेसह मविआला देणार कडकडीत डोस

BJP Rally on Maharashtra din: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनी मुंबईत एक जाहीर सभा होणार आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. येत्या काळात होणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 एप्रिल : 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) भाजपने मुंबईत एक जाहीर सभा (BJP Rally in Mumbai) आयोजित केली आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल कऱण्यात येणार आहे. तसेच या सभेत भाजपकडून मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोनाच्या नंतर केवळ भाजपने इतका मोठा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसह महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. मुंबईतील सोमय्या मैदानात हजारो कार्यकर्ते उत्साहात, आनंदात येणार आहेत. 1 मे रोजीच्या या सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे. बुस्टर डोस यासाठी की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुस्टर आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीला कडकडीत डोस असा तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम हा देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने संपूर्ण महाराष्ट्र अनुभवेल. गेल्या काही दिवसांत, काळोखात, मेट्रोच्या कारशेडच्या पत्र्याच्या मागे लपून एखाद दगड मारण्याचा जो प्रयत्न करत आहेत तिथपासून पोलखोलच्यमा माध्यमातून आम्ही शिवसेनेची लख्तरे काढत आहोत या सर्वांचा आढावा तर घेतला जाईलच पण कुणी 14 मे ला सभा घेणार आहे, कुणी 30 तारखेला, कुणी 1 मे रोजी सभा घेणार आहे. या सर्वांना कडकडीत डोस हा बुस्टर डोसमधून देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यातून मिळेल असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. वाचा : भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार महाविकास आघाडी आता एकजुटीने मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी घेतलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर मिश्किल पद्धतीत आणि खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. येत्या सभेतही ते तशाप्रकारची टीका करु शकतात. पण राज ठाकरे यांच्या सभांना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्ष रोखठोक उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण भोंगे आणि हनुमान चालिसाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 30 एप्रिलला पुण्यातील अलका टॉकिज चौकात होणार आहे. या सभेला तीनही पक्षांमधील नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी पुण्यातच असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. ते पुण्याहूनच औरंगाबादला सभेसाठी जाणार आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ashish shelar, BJP, Maharashtra News

    पुढील बातम्या