मराठी बातम्या /बातम्या /देश /राणा दाम्पत्याला कोर्टासमोर हजर करणार, सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली, PM, CM अन् राज एकाच मंचावर.. TOP बातम्या

राणा दाम्पत्याला कोर्टासमोर हजर करणार, सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली, PM, CM अन् राज एकाच मंचावर.. TOP बातम्या

आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे

आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 24 एप्रिल : शनिवारी झालेल्या राड्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आता न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. लता मंगेशकर पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता. कोल्हापूरच्या सभेत शरप पवारांनी टोचले राज ठाकरे यांचे कान. किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला आहे. राजस्थानातील अलवर येथील घटनास्थळी काँग्रेस शिष्टमंडळाची भेट. यासह देशविदेशातील घडामोडी वाचा अवघ्या काही मिनिटांत.

राणा दाम्पत्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धारावर आलेल्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल केले आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.

कंबोज यांच्यापाठोपाठ किरीट सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली

भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. (shivsena workers attack on kirit somiya car)

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांची नावं घेतो : पवार

'माझ्यावर टीका केली की, मी शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शाहु, फुले आणि आंबेडकर यांचं नाव का घेत आहे. शिवरायांचं नाव हे तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. लोकांना आजही विचारलं गेलं तर त्यांचं उत्तर फक्त शिवाजी महाराज असं येतं. शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज होते, ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे स्थान अंतकरणात आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

2024 मध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा : मुंडे

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढत आहोत. पण, या निवडणुकीत आता आपलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा निर्धार करतो, अशी इच्छाच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यासमोर बोलून दाखवली.

खडसेंनी सांगितला फडणवीसांचा सत्ता मिळवण्याचा प्लॅन

'सत्ता जोपर्यंत मिळत नाही हे चालतंच राहणार आहे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि मागच्या दारने सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा सल्लावजा इशाराच राष्ट्रवादीचे नेते एकना खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच दिला.

CBSE चा मोठा निर्णय!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 11वी आणि 12वी (CBSE 10th 12th syllabus 2022) साठीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून अलिप्ततावादी आंदोलन (Non-Aligned Movement), शीतयुद्धाचा काळ ( Cold War era), आफ्रिकी-आशियाई क्षेत्रात इस्लामी साम्राज्याचा उदय, मुगल दरबाराचा (Mughal courts) इतिहास आणि औद्योगिक क्रांतिशी संबंधित धडे काढून टाकले आहेत.

पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला भेट देतील. यावेळी ते देशभरातील सर्व ग्रामसभांना संबोधित करतील.

काँग्रेसच्या शिष्टमंडळ अलवारला

कॅबिनेट मंत्री टिका राम जुल्ली, जोहरी लाल मीना आणि भंवर जितेंद्र सिंग यांनी स्थापन केलेल्या शिष्टमंडळाने अलवरला भेट दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या घटनेचा निषेध केला आणि प्रदेशातील ‘शांतता भंग’ केल्याबद्दल भाजपला फटकारले.

IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट

देशाची राजधानी दिल्लीसह देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. (Coronavirus Infection) आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे.  (Covid Cases in IIT Madras) कारण येथे तब्बल 55 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी राज्य लसीकरण केंद्रावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे सांगितले.

जहांगीरपुरी हिंसाचार

रोहिणी कोर्टाने एनएसए कायद्याखाली अकट केलेले आरोपी अन्सार, सोनू, सलीम, दिलशाद आणि अहिर यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 9 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra