मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर खडसेंनी सांगितला फडणवीसांचा सत्ता मिळवण्याचा प्लॅन, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर खडसेंनी सांगितला फडणवीसांचा सत्ता मिळवण्याचा प्लॅन, म्हणाले...

'अजूनही हेच प्रकार सुरू आहे. सरकारला धक्का पोहोचत नाही. म्हणून हे प्रकार सुरूच आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही

'अजूनही हेच प्रकार सुरू आहे. सरकारला धक्का पोहोचत नाही. म्हणून हे प्रकार सुरूच आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही

'अजूनही हेच प्रकार सुरू आहे. सरकारला धक्का पोहोचत नाही. म्हणून हे प्रकार सुरूच आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही

कोल्हापूर, 23 एप्रिल : 'सत्ता जोपर्यंत मिळत नाही हे चालतंच राहणार आहे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि मागच्या दारने सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा सल्लावजा इशाराच राष्ट्रवादीचे नेते एकना खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच दिला.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार भाषणं करत भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'आमच्या फडणवीसांना असं झालंय की, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं झालं. पण एवढा नवरा उतावळा झाला आहे. सत्ता सुंदरीसाठी मागं लागलाय. ईडी पाठीमागे लावायची. अनिल देशमुख यांच्या घरावर ११० वेळा ईडीची धाड टाकली.  ११० धाड टाकून काय मिळालं? असा सवालच खडसेंनी केला.

'माझा आणि संजय राऊत यांचा फोन टॅप केला होता. निवडणुकीच्या काळात माझ्या पीएचा फोन टॅप केला. माजे सहकारी असून फोन टॅप केला. 67 वेळा फोन टॅप केला. इतकी हलकट आणि नीच प्रवृत्ती मी राजकारणात आजपर्यंत पहिली नाही' अशी जळजळीत टीकाही खडसेंनी केली.

'अजूनही हेच प्रकार सुरू आहे. सरकारला धक्का पोहोचत नाही. म्हणून हे प्रकार सुरूच आहे.  जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत असं सुरू राहील. पण शरद पवार जोपर्यंत पाठीशी उभे आहे, तोपर्यंत काहीही होणार नाही. २०२४ मध्ये सुद्धा सत्ता आपलीच येईल. राष्ट्रवादी नंबरच एकच पक्ष राहणार आहे' असंही खडसे म्हणाले.

'राजकारणाच्या दृष्टीने फार लक्ष देऊ नका, ही नौटंकी आहे. सत्ता जोपर्यंत मिळत नाही हे चालतंच राहणार आहे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि मागच्या दारने सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असंही खडसेंनी सांगितलं.

First published:
top videos